जिल्ह्यात रेती तस्करीला उधाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 06:00 AM2019-12-10T06:00:00+5:302019-12-10T06:00:25+5:30

पवनी तालुक्यातील जुनोना, कोदुर्ली व अन्य रेती घाटांमधून रेतीची वाहतूक राजरोसपणे सुरू आहे. विशेष म्हणजे ज्या ट्रॅक्टरमधून रेतीची चोरटी वाहतूक सुरू आहे, त्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला नंबर नाही. कालही कोदुर्ली घाटावर महसूल प्रशासनाने पाच ट्रॅक्टर पकडले. त्यात ट्रॅक्टर विना नंबरचे आहेत. या वाहनांनी अपघात झाल्यास तर तक्रार कशी करावी हा कायदेशिर प्रश्न उपस्थित होतो.

Extraction of sand smuggling in the district | जिल्ह्यात रेती तस्करीला उधाण

जिल्ह्यात रेती तस्करीला उधाण

Next
ठळक मुद्देभावही गगनाला : कोट्यवधींचा महसूल पाण्यात, पथकांवर हल्ल्याच्या घटनातही वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्याला वरदान लाभलेल्या वैनगंगा नदी पात्रातील रेतीच्या तस्करीला उधाण आले आहे. महसूल प्रशासनासह खनिकर्म विभागाचे दुर्लक्षाने रेती तस्करांचे चांगलेच फावत आहे. परिणामी एकीकडे कोट्यवधींचा महसूल बुडत असून तस्करांची मात्र भरभराट झाली आहे.
जिल्ह्याची जीवनदायीनी नदी समजल्या जाणाऱ्या वैनगंगा तिच्या उपनद्यांमध्ये वारेमाप रेतीचे खणन केले जाते. जिल्ह्यात ५० पेक्षा जास्त रेतीघाट असून लिलावाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. मात्र बांधकाम व्यवसायीकांसह कंत्राटदारांना रेतीचा पुरवठा मात्र सुरू आहे. या व्यवसायातून कोट्यवधीची उलाढाल होत असून रेतीचे भावही गगनाला भिडले आहेत.
पावसाळा संपताच इमारत बांधकामाला जोमाने प्रारंभ झाला आहे. परिणामी बांधकाम साहित्यांची मागणीही वाढली आहे. याचाच फायदा रेती तस्कर खुलेआम उचलत आहेत.
वेळप्रसंगी रेतीची वाहतूक करताना अडथळा आणणाºया अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करण्यातही रेती तस्कर मागेपुढे पाहत नाही.
रेती तस्करांची मुजोरी वाढली असून सर्वच विभागांच्या अक्षम्य दुर्लक्षपणाचा फटका जिल्ह्यातील गौण खनिजांना बसत असून खुलेआम लुट सुरू आहे.

विनानंबरच्या ट्रॉलीतून रेतीची वाहतूक
पवनी तालुक्यातील जुनोना, कोदुर्ली व अन्य रेती घाटांमधून रेतीची वाहतूक राजरोसपणे सुरू आहे. विशेष म्हणजे ज्या ट्रॅक्टरमधून रेतीची चोरटी वाहतूक सुरू आहे, त्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला नंबर नाही. कालही कोदुर्ली घाटावर महसूल प्रशासनाने पाच ट्रॅक्टर पकडले. त्यात ट्रॅक्टर विना नंबरचे आहेत. या वाहनांनी अपघात झाल्यास तर तक्रार कशी करावी हा कायदेशिर प्रश्न उपस्थित होतो. विनानंबर प्लेटची वाहने तेही रेती वाहतुकीसाठी वापरली जात असताना परिवहन विभाग, पोलीस व महसूल प्रशासन कारवाई का करीत नाही, हा संशोधनाचा विषय आहे. याचा अर्थ प्रशासनाच्या आशिर्वाद रेती तस्करीला आहे काय, असा प्रश्नही नागरिकांसमोर उपस्थित होतो.

Web Title: Extraction of sand smuggling in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :sandवाळू