शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
2
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
3
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
4
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
5
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
6
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
7
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
8
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
9
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
10
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
11
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
12
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
13
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
14
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
15
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
16
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
17
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
18
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
19
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
20
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

सरकारकडून सामान्य जनतेचे शोषणच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 11:35 PM

मन की बात आता संपली आहे. पंतप्रधानांच्या भाषणाला जनता कंटाळली आहे. नोटबंदी व जीएसटीचे दुष्परिणाम सामान्य जनता भोगत आहे. भाजप सरकार खोटारडे असून सामान्य जनता, ......

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मन की बात आता संपली आहे. पंतप्रधानांच्या भाषणाला जनता कंटाळली आहे. नोटबंदी व जीएसटीचे दुष्परिणाम सामान्य जनता भोगत आहे. भाजप सरकार खोटारडे असून सामान्य जनता, शेतकरी, व्यापारी, युवकांचे सरकारद्वारा नवनवीन कायदे निर्माण करून शोषण करीत आहे. तेव्हा सरकारला धडा शिकविण्यासाठी गाव पातळीवरून समोर येणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जोमाने काम करा, असे आवाहन खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा पदाधिकारी कार्यकर्ता बैठकीत ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी खासदार प्रफुल पटेल होते. यावेळी मंचावर जिल्हाध्यक्ष माजी आमदार मधुकर कुकडे, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजेश डोंगरे, दुग्ध संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी, प्रदेश महासचिव धनंजय दलाल, माजी नगराध्यक्ष बाबूराव बागडे, सभापती नरेश डहारे उपस्थित होते.यावेळी खा.पटेल म्हणाले, सध्याचे सरकार हे देशात आर्थिक संकट निर्माण करीत आहे. विरोधक प्रफुल पटेलांविषयी अपप्रचार करून कार्यकर्त्यांचे मनोबल कमी करीत आहेत. तेव्हा कार्यकर्त्यांनी खचून जावू नये. भंडारा, गोंदिया जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी हे जनता समस्याग्रस्त असताना केवळ पळपुटपणाचे धोरण अवलंबत आहे. तेव्हा ग्रामपंचायतच्या निवडणुकातून त्यांना धडा शिकवा, मी नेहमीच भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील जनतेसाठी काम करणार असल्याचे खा.पटेल यांनी सांगितले.यावेळी तालुका अध्यक्ष व कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्यात भाजप व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. महिला पदाधिकाºयांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक धनंजय दलाल यांनी तर आभारप्रदर्शन अभिषेक कारेमोरे यांनी केले.या बैठकीत अ‍ॅड.विनयमोहन पशिने, विजय डेकाटे, डॉ.श्रीकांत वैरागडे, लोमेश वैद्य, कल्याणी भुरे, नितीन तुमाने, धनेंद्र तुरकर, वासुदेव बांते, उर्मिला आगाशे, शुभांगी राहांगडाले, विठ्ठल कहालकर, दामाजी खंडाईत, मधुकर सांभारे, देवचंद ठाकरे, स्वप्नील नशिने, दिपक चिमणकर, अविनाश ब्राम्हणकर, तोमेश्वर पंचभाई, मकसुद पटेल, हितेश सेलोकर, डॉं.विकास गभणे, शैलेश मयूर, अंगराज समरीत, रेखा ठाकरे, रिता हलमारे, संजय केवट, भगीरथ धोटे, सुनिल शहारे, उत्तम कळपते गीता माटे जि.प. सदस्य, सुनिल घोगरे, सुरेश रहांगडाले, योगेश सिंगनजुडे, दिपक चिमणकर, ज्योती खवास, लोमेश वैद्य, अमर उजवणे, राजू पटेल, उमेश तुरकर, बाबूराव मते, यादोराव भोगे, मुकेश बावनकर, दिलीप सोनवाने, ज्योती टेंभुर्णे, उर्मिला आगाशे, धनू व्यास, सुरेश बघेल, किशोर चौधरी, उमेश ठाकरे, रामभाऊ गाजीमवार, बाबा सय्यजादा, सुनिल घोगरे, मोहन डोरले, विनोद बाभरे, शुभांगी खोब्रागडे, सुनिलसाखरकर, प्रभाकर सपाटे, जुमलाताई बोरकर न.प. सदस्य, प्रेरणा तुरकर, मधुकर चौधरी, सुरेश सावरबांधे, मदन रामटेके, छोटू बाळबुधे, अक्षय रामटेके, सुरेश कापगते यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.