शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
3
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
6
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
7
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
8
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
9
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
10
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
11
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
12
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
13
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
15
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
16
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
17
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
18
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
19
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
20
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
Daily Top 2Weekly Top 5

चौपदरीकरणातून होणार राज्य मार्गाचा विस्तार

By admin | Updated: August 30, 2016 00:20 IST

वाढती लोकसंख्या, वाढत्या दळणवळणाची साधने व वाढत्या अपघाताला आळा घालण्यासाठी शासनाने एकेरी रस्त्याचे दुहेरी व दुहेरी रस्त्याचे चौपदरीकरण करण्याचे ठरविले आहे.

धडपड वाढली : एन.एच.ए. आय. चा सर्वेक्षण सुरुविलास बन्सोड उसर्रावाढती लोकसंख्या, वाढत्या दळणवळणाची साधने व वाढत्या अपघाताला आळा घालण्यासाठी शासनाने एकेरी रस्त्याचे दुहेरी व दुहेरी रस्त्याचे चौपदरीकरण करण्याचे ठरविले आहे. त्याचाच एक भाग म्हणून रामटेक ते गोंदिया राज्य मार्ग क्र. ३३५ चे चौपदरीकरणाचे एन.एच.ए.आय. चे सर्वेक्षण सुरु झाले आहे.वाढत्या साधन सामुग्रीमुळे जुने रस्ते अपुरे पडत आहे. यासाठी शासनाने अशा रस्त्यांना मंजुरी देण्यात आले असल्याचे बोलले जाते आहे. एनएचएआय म्हणजे नॅशनल हायवे आॅथोरिटी आॅफ इंडिया ही नामांकित कंपनीने रामटेक ते गांदिया या राज्य मार्ग क्रमांक ३३५ वर सदर रस्ता चौपदरीकरण करण्यासाठी सर्वेक्षण करायला सुरुवात केली आहे. रस्ता चौपदरीकरण व्हावा यासाठी रस्त्याच्या केंद्रबिंदू पासून २० मीटर लांब रस्ता आता चौपदरीकरण होणार आहे. येत्या काही दिवसात सर्वेक्षण पूर्ण होणार असून एन.एच.ए.आय. आपला सर्वे पी.आय.डी.सी. नोएडा ला देण्यात येणार आहे. या सर्वेक्षणाच्या आधारावर संबंधित विभाग सदर चौपदरीकरण रस्त्याच्या अंदाजपत्रक बनवणार असे समजते.सध्या तुमसर- रामटेक राज्यमार्गावर असलेल्या उसर्रा येथे एनएचएआय चा सर्वेक्षण सुरु आहे. सदर रस्ता चौपदरीकरण होत असून रस्त्याच्या कायापालट होणार हे सत्य आहे. पण रामटेक ते गोंदिया या राज्यमार्गावर बरेचसे गावे रस्त्यावर लागून असल्याने व त्यांच्या २० मीटर जागा रस्त्यात जाणार असल्याने नागरिकांचे घरे रस्त्यात जाणार म्हणून नागरिकांची धडपड वाढली आहे. पुनर्वसनाचे काय?रामटेक - गोंदिया मार्गावरील हिवरा, वासेरा, कांद्री, जांब, धोप, सालई खुर्द, उसर्रा, काटेबाम्हणी, खापा सदर गावे रस्त्यालगत आहेत. येथील बरीच घरे, जमीन सदर चौपदरीकरण रस्त्यात जाणार आहे. पण त्या घराचे पुर्नवसनाची जबाबदारी शासनाने घ्यावी असे सर्वदूर बोलले जात आहे. शासनाने सर्वेक्षण सुरु जरी केला असला तरी आतापासून नागरिकांनी सावरासावर करायला सुरुवात केली आहे. सर्वात जास्त फटका कांद्री, सालई खुर्द, धोप, उसर्रा व खापा या गावांना बसणार आहे. चौपदरीकरणातून रस्त्याचे कायापालट होईल. पण पुनर्वसनाचा प्रश्न आतापासून भेडसावू लागला आहे. रस्त्यावर काहींनी आपली उपजिवीकेसाठी लावलेली चहापान दुकानदारांचे स्वप्न भंगणार असून त्यामुळे त्यांचा संसार उघड्यावर येईल. शासन याकडे लक्ष देईल काय?सध्या सदर रस्ता तयार होण्यासाठी बराच वेळ लागणार आहे. रस्त्याच्या केंद्रबिंदूपासून १७५ फूट लांब असा रस्ता आहे. गावालगतच्या जागेला ही लांबी कदाचित कमी असेल. पुर्नवसनाचे काम शासनस्तरावर केले जाईल. पण सध्या वेळ आहे.-प्रभाकर कापगते,शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मोहाडी