शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

दूर्मिळ ‘ब्लॅक लेपर्ड’ची जोडी आढळल्याने वनप्रेमींमध्ये उत्साह, पण जंगल सफारी बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 13:54 IST

दूर्मिळ असलेला ब्लॅक लेपर्ड दिसल्याने ‘मोगली’ या बालकांच्या कथासंग्रहातील काळ्या बिबट्याचे चित्रण डोळ्यासमोर उभे राहते. मागील घटनांमध्ये ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि पेंच व्याघ्र प्रकल्पातील काळ्या बिबट्या आढळल्याची नोंद आहे

ठळक मुद्देबिलाल हबीब यांनी ट्विटर अकाऊंटवर शेअर केलेल्या आणखी एका चित्रामध्ये याच क्षेत्रामध्ये जमिनीवर एक ‘रस्टी स्पॉटेड मांजर’दर्शविली गेली आहे. ही मांजरीची प्रजाती अर्बोरियल आणि फारच क्वचितच आढळते

भंडारा : महाराष्ट्रातील गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील नागझिरा अभयारण्य किमान अपेक्षेने आश्चर्यचकित करण्यासाठी ओळखला जातो. अशा नवेगाव-नागझिरा अभयारण्यात दुर्मिळ ‘ब्लॅक लेपर्ड’ (काळा बिबट) आढळल्याने वनप्रेमीमध्ये उत्साह संचारला आहे. परंतु पावसाळ्यामुळे जंगल सफारी बंद पडल्याने काही जण निराश झाले आहेत. ही दूर्मिळ बिबट्याची जोडी अभयारण्यातील ट्रॅप कॅमेऱ्यात टिपली गेली असून हे छायाचित्र मे महिन्यातील असल्याचे प्राथमिक माहितीवरून स्पष्ट होत आहे. याबाबत अजूनपर्यंत डब्ल्यूआयआयने पूर्णत: खुलासा केलेला नाही.

दूर्मिळ असलेला ब्लॅक लेपर्ड दिसल्याने ‘मोगली’ या बालकांच्या कथासंग्रहातील काळ्या बिबट्याचे चित्रण डोळ्यासमोर उभे राहते. मागील घटनांमध्ये ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि पेंच व्याघ्र प्रकल्पातील काळ्या बिबट्या आढळल्याची नोंद आहे. भारतीय वन्यजीव संस्थेतील वैज्ञानिक बिलाल हबीब यांनी ट्विटर हँडलवर बिबट्याच्या जोडीचे छायाचित्र शेअर केले आहे. यात भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील नागझिरा-नवेगाव टायगर रिझर्व्ह लँडस्केपचा उल्लेख केला आहे. पण या जोडप्याच्या ठिकाणी असलेल्या अभयारण्याची अचूक माहिती देण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे अधिवास नष्ट होणे आणि शिकार केल्यामुळे भारतीय बिबट्या एक असुरक्षित प्रजाती म्हणून सूचीबद्ध आहेत. त्यात या बिबट जोडीचे दिसणे एक आश्चर्याची बाब समजली जात आहे.

बिलाल हबीब यांनी ट्विटर अकाऊंटवर शेअर केलेल्या आणखी एका चित्रामध्ये याच क्षेत्रामध्ये जमिनीवर एक ‘रस्टी स्पॉटेड मांजर’दर्शविली गेली आहे. ही मांजरीची प्रजाती अर्बोरियल आणि फारच क्वचितच आढळते. भंडारा येथील नियमित वन पर्यटक आणि तसेच वन्यजीव छायाचित्रकार विवेक हुरा म्हणाले, आमच्या नागझिराकडून आलेली ही पहिली घटना आहे. नागझिरा आश्चर्यचकित आहे, आणि कधीही निराश न करणारे स्थळ आहे. मेलेनिस्टिक बिबट्यांचा जनुकमध्ये एक वेगळा बदल असल्याचेही त्यांनी सांगितले.

ट्रॅप कॅमेऱ्याने टिपले दृश्य

नागझिरा-नवेगाव टायगर रिझर्व्ह क्षेत्रात ठिकठिकाणी ट्रॅप कॅमेरा लावण्यात आले आहेत. या अभयारण्याचे क्षेत्र ६५० चौरस किलोमीटर आहे. ब्लॅक लेपर्ड हा आपल्या सोबत्यासह नागझिरा-नवेगाव टायगर रिझर्व्ह (एनएनटीआर) अभयारण्यातील ट्रॅप कॅमेऱ्यात टिपला गेला. या कॅमेऱ्यात झालेल्या नोंदी डब्ल्यूआयआयकडे व भारतीय वन्यजीव संस्थेकडे पाठविल्या जातात. याबाबात वनविभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे. भारतीय वन्यजीव संस्थेतील वैज्ञानिक बिलाल हबीब यांनी ट्विटर हँडलवर बिबट्याच्या जोडीचे छायाचित्र शेअर केल्यानंतर ही बाब उघडकीस आली.

बिबट्यांची जोडी कॅमेरा ट्रॅप पिक्चर कॉर्टिंगमध्ये दिसू शकते. एनएनटीआर फील्ड स्टाफकडून कॅमेरा ट्रॅपचा वापर राबविला जात आहे. ‘डेटा’ विश्लेषणासाठी डब्ल्यूआयआयकडे पाठविला गेला आहे. अधिक माहिती लवकरच जाहीर केली जाईल,- मणिकंद रामानुजम,मुख्य वनसंरक्षक तथा फील्ड डायरेक्टर, नागझिरा-नवेगाव टायगर रिझर्व्ह.

बिबट्याची जोडीचे छायाचित्र नागझिरा-नवेगाव टायगर रिझर्व्हमधील नवेगाव भागातील आहे. नागझिरासाठी ही एक चांगली बातमी आहे. यामुळे नागझिरा आणि नवेगाव इको टूरिझमला चालना मिळेल,- नदीम खान, मानद वन्यजीव संरक्षक, भंडारा.

 

नवेगावमध्ये विविध जैवविविधता असून गतकाळात अनेक दुर्मिळ प्रजाती परिसरात आढळतात. नवेगाव क्षेत्रात बिबट्यांची जोडी आढळली ही आमच्यासारख्यांसाठी मोठी पर्वणीच आहे.-सावन बहेकर, मानद वन्यजीव संरक्षक गोंदिया. 

टॅग्स :bhandara-acभंडाराleopardबिबट्याforestजंगलTadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प