शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

स्वीप कार्यक्रमाची अंमलबजावणी करा

By admin | Updated: September 24, 2014 23:26 IST

मतदारांनी विधानसभा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी स्वीप कार्यक्रमाची योग्य अंमलबजावणी करावी. सर्व मदारांना मतदानाची तारीख आणि वेळ माहित होण्यासाठी प्रसार

भंडारा : मतदारांनी विधानसभा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी स्वीप कार्यक्रमाची योग्य अंमलबजावणी करावी. सर्व मदारांना मतदानाची तारीख आणि वेळ माहित होण्यासाठी प्रसार व प्रचार करावा अशा सूचना जागृकता निरीक्षक एल.मधू नाग यांनी दिल्या आहेत.लोकसभा निवडणुकीत कमी मतदान झालेल्या लाखनी, साकोली, तुमसर आणि मोहाडी तालुक्यातील मतदान केंद्रांना नाग यांनी भेट दिली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली. लाखनी येथील समर्थ महाविद्यालयातील मतदान केंद्र ११६, ११७, ११८ ची पाहणी केली. या केंद्रावरील बुथ लेवल अधिकारी तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ.राम आर्वीकर यांच्याशी चर्चा केली. महाविद्यालयातील विद्यार्थी, एन.एस.एस., एन.सी.सी.चे विद्यार्थी यांचा सहभाग घेऊन या मतदान क्षेत्राच्या भागात मतदानाविषयी वातावरण निर्मिती करावी, अशा सूचना दिल्या आहेत. साकोली येथील कमलाबाई कनिष्ठ महाविद्यालय एकोडी येथील जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय, मतदार मदत केंद्र, तुमसर येथील नगर परिषद बांगळकर उच्च प्राथमिक शाळा, तुमसर येथील चिखला माईन आणि मोहाडी येथील कमी मतदान झालेल्या केंद्राची पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना मतदानाविषयी जागृकता करण्यासाठी दुर्गोत्सवाच्या ठिकाणी मंडळाने पोस्टर, बॅनर लावावे, विद्युत बिल, पाणी बिल आणि गॅस सिलेंडरच्या पावतीवर मतदानाची तारीख आणि वेळ छापण्यात यावी, अशा सूचना केल्यात. यावेळी त्यांच्यासोबत साकोलीचे उपविभागीय अधिकारी दिलीप तलमले, तहसीलदार हंसा मोहणे, तुमसरचे उपविभागीय अधिकारी अशोक लटारे, तहसीलदार सचिन यादव, कल्याणकुमार डहाट, पोलीस अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)