शहरं
Join us  
Trending Stories
1
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
2
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
3
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
4
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
5
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
6
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
7
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
8
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
9
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
10
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
11
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
12
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
13
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
14
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
15
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
16
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई
17
भारतीय महिला संघ लॉर्ड्स वनडे जिंकण्यास सज्ज; इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना आज
18
मुंबईची सारा जामसुतकर ठरली ‘चॅम्पियन’
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडून विद्यार्थ्याचा अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 22:12 IST

परीक्षा केंद्रावर ट्रॅक्टरने डेस्क व बेंच सोडण्यासाठी गेलेल्या १५ वर्षीय विद्यार्थी ट्रॅक्टरहून कोसळला. यात तो चाकाखाली सापडल्याने त्याचा जागीच करूण अंत झाला. चेतन विनायक जवंजाळ रा.मिरेगाव असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. ही घटना मंगळवारला किटाडी येथे सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने गावात तणाव असून मुख्याध्यापक, शाळेचे संचालक व ट्रॅक्टर चालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीला घेऊन आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देकिटाडी येथील घटना : गावात तणाव, रात्री उशिरापर्यंत निघाला नाही तोडगा

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : परीक्षा केंद्रावर ट्रॅक्टरने डेस्क व बेंच सोडण्यासाठी गेलेल्या १५ वर्षीय विद्यार्थी ट्रॅक्टरहून कोसळला. यात तो चाकाखाली सापडल्याने त्याचा जागीच करूण अंत झाला. चेतन विनायक जवंजाळ रा.मिरेगाव असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. ही घटना मंगळवारला किटाडी येथे सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने गावात तणाव असून मुख्याध्यापक, शाळेचे संचालक व ट्रॅक्टर चालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीला घेऊन आंदोलन करण्यात आले.माहितीनुसार, चेतन हा मिरेगाव येथील शुक्राचार्य विद्यालयाचा इयत्ता नवव्या वर्गाचा विद्यार्थी होता. मंगळवारला शिवजयंतीचा कार्यक्रम असल्यामुळे चेतन शाळेत गेला होता. बारावी व दहावीचे परीक्षा केंद्र मुंडीपार येथे असल्याने शाळेच्या शिक्षकांनी ट्रॅक्टरद्वारे डेक्स बेंच पाठविण्याचे ठरविले. सदर साहित्य पोहचवून देऊन उतरविण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांना देण्यात आली होती. मुंडीपार येथील शाळेत साहित्य उतरवून ट्रॅक्टरद्वारे परत येत असताना किटाडी येथे अचानक चेतना हा ट्रॅक्टर चालकाजवळील जागेहून खाली कोसळला. यात ट्रॅक्टरच्या चाकात सापडल्याने त्याचा जागीच दबून करुण अंत झाला. घटनेची माहिती गावात होताच घटनास्थळी एकच गर्दी झाली. जोपर्यंत मिरेगाव येथील मुख्याध्यापक व संचालक घटनास्थळी येऊन जाहीर माफी मागीत नाही व त्यांच्यावर मनुष्यबळाचा गुन्हा दाखल केला जात नाही तोपर्यंत विद्यार्थ्याचा मृतदेह उचलू देणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली होती.साकोली पोलीस ठाण्यात मृतक विद्यार्थ्याचे कुटुंबिय, आमदार बाळा काशीवार, शाळेचे संस्थापक, मुख्याध्यापक, पोलीस निरीक्षक, पद्माकर बावनकर, लवकुश निर्वाण यांच्यात चर्चा झाली. मात्र चर्चेदरम्यान कुठलाच तोडगा निघाला नाही. परिणामी जवंजाळ कुटुंबिय घटनास्थळी आले. घटनास्थळावर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर टिक्कस, तहसीलदार अरविंद हिंगे यांनी भेट दिली. विद्यार्थ्याचा मृतदेह रस्त्याशेजारी एका घराजवळ ठेवण्यात आला होता. पाहता पाहता नागरिकांची गर्दी झाली होती. पोलिसांनीही तात्काळ बंदोबस्त लावला. आंदोलकांनी सायंकाळपर्यंत मृतक कुटुंबाला १० लक्ष रुपयांची मदत करावी अशी मागणी केली. आंदोलकांनी केलेल्या मागण्यांवर शेवटपर्यंत कुठलाही तोडगा निघाला नाही. वृत्त लिहिपर्यंत पोलिसांनी कठोर भूमिका घेत कुटुंबिय व आंदोलकांशी चर्चा करीत न्याय्य मागण्यांसाठी न्यायालयात दाद मागावी अशी सूचना करीत विद्यार्थ्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी साकोली उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असल्याची माहिती आहे.पोलिसांनी या प्रकरणी अपघातात एक जण ठार नोंद केली असल्याची माहिती आहे.मंगळवारला शाळेला सुटी होती. त्यामुळे मुलांना साहित्य पोहचवून देण्यासाठी ट्रॅक्टरवर मी पाठविलेले नाही. डेक्स व बेंच शाळेच्या कर्मचाऱ्यांना पोहचवायला सांगितले होते.-सारंग गजापुरे, मुख्याध्यापक, शुक्राचार्य विद्यालय, मिरेगाव.