शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

तलावाच्या २५ एकर जमिनीवर अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 22:48 IST

तालुक्यातील पिंपळगाव (को) येथील मोठया तलावातील (गट क्रमांक ३०५) जमिनीवर शेतीसाठी अतिक्रमण सुरू असताना ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी हे काम रोखले.

ठळक मुद्देपिंपळगाव येथील प्रकार : अतिक्रमण करणाऱ्याला ग्रामस्थांनी पकडले

आॅनलाईन लोकमतलाखांदूर : तालुक्यातील पिंपळगाव (को) येथील मोठया तलावातील (गट क्रमांक ३०५) जमिनीवर शेतीसाठी अतिक्रमण सुरू असताना ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी हे काम रोखले. त्यानंतर लघुपाटबंधारे विभागाला माहिती देताच उपविभागीय अभियंता व त्यांच्या चमूने भेट देऊन पाहणी केली.सदर लघु पाटबंधारे विभागाच्या २५ एकर जागेवर अतिक्रमण करणाऱ्या हरी शेंडे यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव (को) येथील गट क्रमांक ३०५ आराजी ८९.९२ हेक्टर जागा मालगुजारी तलावात मोडते.यातील ४० एकर जागेत विस्तीर्ण तलाव असून या तलावात पाणी असून येथूनच लाखांदुरला पाणीपुरवठा केला जातो. याच तलावातील जागेमध्ये हरी शेंडे यांनी मागील तीन दिवसांपासून तलावाच्या जागेत शेती कसण्यासाठी ट्रॅक्टरने मशागतीला प्रारंभ केला होता.दरम्यान, याची ही माहिती शुक्रवारला सकाळी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना कळली. त्यानंतर सकाळी ११ वाजतापासून शेकडो लोकांनी तलावाकडे कूच केली. अधिकारी येईपर्यंत व अतिक्रमण करणाऱ्या हरी शेंडे याच्याविरूद्ध पोलीस कारवाई होईपर्यंत घटनास्थळावरून हटणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली.त्यामुळे भंडारा लघु पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता पी.ए. पुनवतकर, पठाण, सचिन राठोड, गजापुरे, डोये, ठेंगरे, वनक्षेत्राधिकारी रमेश दोनोडे, सहायक क्षेत्राधिकारी पंचभाई , वनपाल मंजेलवर, सरपंच शालू गहाने, उपसरपंच गोपाल परशुरामकर, वनहक्क समितीचे सचिव लक्ष्मण पुष्तोडे, ग्रामपंचायत सदस्य हिरा गजभिये, भिवराज परशुरामकर, देवराम परशुरामकर, गोवर्धन गहाने, प्रशांत मेश्राम, यादव परशुरामकर, फुलबांधे, तलाठी गवाणकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.यावेळी तलावात अतिक्रमण करणाऱ्याविरूद्ध कारवाई करण्याची एकमुखी मागणी नागरिकांनी केली. यावेळी घटनास्थळी उभे असलेल्या झाडांची साल काढून ही झाडे वाळविण्याचा प्रकार केल्याचे उघडकिला आले.शेकडो झाडे कापून विकण्याचा गोरखधंदा हरी शेंडे याने केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. यावेळी उपविभागीय अभियंत्यांनी हा विषय कार्यकारी अभियंता यांच्याकडे मांडणार असल्याचे सांगून त्यानंतर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.मागील अनेक वर्षांपासून या तलावातील जागेवर अतिक्रमण होत आहे. ही बाब गंभीर असून ग्रामपंचायतच्या तक्रारीच्या आधारे कार्यकारी अभियंता यांचे मार्गदर्शन मागवून संपूर्ण जुने व नवीन अतिक्रमण काढणार आहे.- पी.ए. पुनवतकर, उपविभागीय अभियंता, लघु पाटबंधारे लाखांदूर.पिंपळगाव येथील तलाव हे पाणीपुरवठा योजना व मासेमारीकरीता वरदान आहे. मागील दहा वर्षात तीन एकरावर अतिक्रमण केल्यानंतर आता चक्क २५ एकरावर अतिक्रमण करून तलावाचे अस्तित्व नष्ट करण्याचा डाव आहे. संबंधित विभाग व लोकप्रतिनिधींना तक्रार करून तलावातील अतिक्रमण काढणार आहे.- शालू गहाणे, सरपंच, पिंपळगाव (को.) ता.लाखांदूर.