शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

शाळा व्यवस्थापन समितीची निवडणूक नियमबाह्य

By admin | Updated: November 26, 2014 23:02 IST

मुंढरी खुर्द येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेची व्यवस्थापन समितीची निवडणूक दि.२४ नोव्हेंबर रोजी दुपारी घेण्यात आली. परंतु प्रक्रिया राबविताना मुख्याध्यापिकेने नियमबाह्य व ग्रामपंचायत

करडी/पालोरा : मुंढरी खुर्द येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेची व्यवस्थापन समितीची निवडणूक दि.२४ नोव्हेंबर रोजी दुपारी घेण्यात आली. परंतु प्रक्रिया राबविताना मुख्याध्यापिकेने नियमबाह्य व ग्रामपंचायत पदाधिकारी आणि पालकवर्गाचे म्हणणे ऐकून न घेता मनमर्जीने समितीची निवड केली. मुख्याध्यापिकेची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी सरपंच गौरीशंकर नेरकर यांनी गटशिक्षणाधिकारी यांना तक्रारीतून केली आहे.मुंढरी खुर्द जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका पदमाकर रामटेके यांनी शाळा व्यवस्थापन समितीची निवडणूक घेण्याचे नोटीस पालक वर्गाला पाठविली. मात्र पालक सभा व निवडणूक होण्यासंबंधी गावातील प्रतिष्ठीत मंडळी व जुन्या समितीच्या लोकांना कळविले नाही, बोलविले सुद्धा नाही. पालक सभेत वेळेवर प्रक्रियेचे रोस्टर जाहिर केले. त्यानंतर लगेच बंद खोलीत निवडणूक पार पाडली. काही पालक वर्गांनी विरोध दर्शविला. तरी त्यांना न जुमानता निवड सुरू ठेवली. मुख्याध्यापिकेने माजी शाळा समिती अध्यक्ष, सरपंच, पोलीस पाटील, उपसरपंच अन्य सन्मानित मंडळ यांना विश्वासात न घेता मनमर्जीने समितीची स्थापना केल्याचा आरोप आहे. नियमबाह्य कुणाचे न ऐकता मनमर्जीने वागणाऱ्या मुख्याध्यापिकेच्या कामकाजाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी सरपंच गौरीशंकर नेरकर यांनी आहे. (वार्ताहर)