शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्यातील नवनिर्वाचित ११ ग्रा.पं.च्या सरपंच-उपसरपंचाची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:42 IST

आरक्षित उमेदवाराअभावी दोन ग्रा.पं.चे सरपंच पद रिक्त लाखांदूर : गत जानेवारी महिन्यात लाखांदूर तालुक्यात झालेल्या दोन टप्प्यात तालुक्यातील ११ ...

आरक्षित उमेदवाराअभावी दोन ग्रा.पं.चे सरपंच पद रिक्त

लाखांदूर : गत जानेवारी महिन्यात लाखांदूर तालुक्यात झालेल्या दोन टप्प्यात तालुक्यातील ११ ग्रा.पं. च्या सरपंच उपसरपंचांची निवड करण्यात आली आहे. मात्र सदर निवड प्रक्रियेत तालुक्यातील दोन ग्रा.पं. सरपंच पद अनु. जमाती महिलासाठी आरक्षित होताना संबंधित ग्रा.पं. अंतर्गत महिला उमेदवार निर्वाचित न झाल्याने तालुक्यास्तील दोन ग्रा.पं.चे सरपंच पद पुढील आरक्षण सोडतीपर्यंत रिक्त ठेवण्यात आल्याची माहिती आहे.

प्राप्त माहिती नुसार लाखांदूर तालुक्यात गत जानेवारी महिन्यात ११ ग्रा.पं.च्या सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली होती. सदर निवडणूक प्रक्रिया आटोपताच तालुक्यातील सर्वच ६२ ग्रा.पं.चे पुढील पाच वर्षासाठी सरपंच पदाचे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली होती. सदर सोडत ५० टक्के महिला आरक्षण कायम ठेवून सर्वच प्रवर्गनिहाय काढण्यात आली होती. गत १२ फेब्रुवारी रोजी पहिल्या टप्प्यात तालुक्यातील ५ नवनिर्वाचित ग्रा.पं. सरपंच-उपसरपंचाची निवड करण्यात आली होती. त्यानुसार तालुक्यातील मान्देड/ सावरगाव येथे सरपंच-सुलभा बुरडे तर उपसरपंच-मनोज भर्रे, कोच्छी/ दांडेगाव सरपंच-सुरेखा देसाई, उपसरपंच- मुरली वावरे, गुन्जेपार (किन्ही) सरपंच-वर्षा तोंडरे, उपसरपंच-मनोहर कुटे, कन्हाळगाव/ चिचगाव सरपंच-कांता तलमले, उपसरपंच -नंदू पिलारे व पारडी सरपंच-शिवशंकर चव्हारे, उपसरपंच-गीता शहारे तर १५ फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या उर्वरित ६ ग्रा.पं. च्या सरपंच उपसरपंच निवडणुकीत दोन ग्रा.पं. अंतर्गत अनु. जमाती प्रवर्गातत महिला उमेदवार उपलब्ध न झाल्याने दोन्ही ग्रा.पं.चे सरपंच पदे रिक्त ठेवण्यात आली. तर केवळ उपसरपंचांची निवड करण्यात आली. त्यानुसार तालुक्यातील चिचाळ/कोदामढी सरपंच-रिक्त, उपसरपंच-लक्ष्मण जांगळे, मुर्झा सरपंच-रिक्त उपसरपंच-राहुल उके आदींची निवड करण्यात आली.

दरम्यान, उर्वरित ४ ग्रा.पं.च्या सरपंच उपसरपंच पदाची निवडदेखील करण्यात आली. त्यामध्ये चिचोली/अंतरगाव-सरपंच-प्रमोद प्रधान, उपसरपंच-प्रशांत मेश्राम, पुयार सरपंच-शैलेश रामटेके, उपसरपंच -उत्तरा मेश्राम, सोनी/इंदोरा सरपंच -कुंता शहारे,उपसरपंच-पुरुषोत्तम तलमले व बेलाटी येथे सरपंच-सचिन शिवनकर तर उपसरपंच म्हणून रामटेके नामक महिलेची निवड करण्यात आली. दरम्यान, तालुक्यात नवनिर्वाचित ११ ग्रा.पं.च्या सरपंच-उपसरपंच निवडणुकीच्या दोन्ही टप्प्यात कोणतीही अनुचित प्रकार घडला नाही, हे विशेष.