शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

ईडीची धाड आणि महिन्याच्या आत भाजपात ! भंडाऱ्यात रेती व्यावसायिकांचा भाजप प्रवेश वादाच्या भोवऱ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 15:59 IST

Bhandara : नागपूर जिल्ह्यातील सावनेरमध्ये रेती व्यवसायिकांचा भाजप प्रवेश वादग्रस्त ठरला होता, याच प्रकरणाची पुनरावृत्ती भंडारा जिल्ह्यात झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नागपूर जिल्ह्यातील सावनेरमध्ये रेती व्यवसायिकांचा भाजप प्रवेश वादग्रस्त ठरला होता, याच प्रकरणाची पुनरावृत्ती भंडारा जिल्ह्यात झाली आहे. भंडाऱ्यातील तीन रेती व्यावसायिकांनी नागपुरात जाऊन विधान परिषद सदस्य डॉ. परिणय फुके यांच्या नेतृत्वात आणि भाजप जिल्हाध्यक्ष आशू गोंडाणे यांच्या उपस्थितीत मंगळवार, दि. ३ फेब्रुवारी रोजी प्रवेश घेतला आहे. या पक्षप्रवेशाची छायाचित्रे समाजमाध्यमांवर झळकताच स्थानिक राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

भाजपमध्ये प्रवेश घेणाऱ्यांमध्ये काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांचे विश्वासू मानले जाणारे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष शंकर राऊत, राष्ट्रवादी (शरद पवार) चे माजी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष ठाकचंद मुंगूसमारे आणि अजय गहाणे यांचा समावेश आहे. हे तिघेही तुमसर तालुक्यातील असून, रेती व्यवसायाशी संबंधित आहेत. अजय गहाणे आणि ठाकचंद मुंगूसमारे हे लोभी येथील तर, शंकर राऊत हे डोंगरला येथील रहिवासी आहेत. ठाकचंद मुंगूसमारे यांचाही धान आणि रेतीचा व्यवसाय असून, मागील तीन महिन्यांपूर्वी त्यांच्या गोडाउनमध्ये झालेल्या वादात पिस्तूल निघाले होते. हे प्रकरण गोबरवाही पोलिसात नोंद आहे. तर, शंकर राऊत हे काँग्रेसमधील जुने कार्यकर्ते आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांना ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष पद आमदार नाना पटोले यांच्या शिफारशीवरून बहाल करण्यात आले होते. मात्र, त्यांनीही काँग्रेस आणि नाना पटोले यांची एवढ्या दिवसांची साथ सोडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

अजय गहाणे यांचा रेतीचा व्यवसाय असून, गेल्या महिन्यात ९ जानेवारीला त्यांच्या व्यावसायिक प्रतिष्ठानावर 'ईडी'ची धाड पडली होती. या घटनेला पुरता महिनाही लोटत नाही तोच, गहाणे हे भाजपच्या आश्रयाला आल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे त्यांचा भाजप प्रवेश कशासाठी, अशी चर्चा आता सुरू झाली आहे

तर त्यांचे पक्षप्रवेश तातडीने रद्द करू: परिणय फुके

या वादग्रस्त पक्षप्रवेशाबद्दल भाजप नेते, विधान परिषद सदस्य डॉ. परिणय फुके यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले, आपण अजय गहाणे यांना व्यक्तिशः ओळखत नाही. त्यांच्यावर यापूर्वी 'ईडी'ची कारवाई असल्याची माहितीदेखील आपणास नाही. ठाकचंद मुंगूसमारे हे सकाळी चार ते पाच कार्यकर्त्यांना पक्षप्रवेशासाठी सोबत घेऊन आले होते. त्या सर्वांनी पक्षात येण्यास उत्सुकता दाखविल्याने पक्षप्रवेश देण्यात आला. कुणावर ईडीचे गुन्हे दाखल असतील आणि कुणाची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असेल तर, त्यांचे पक्षप्रवेश तातडीने रद्द केले जातील. अशा व्यक्तींना पक्षात प्रवेश देण्याचा प्रश्नच येत नाही, असेही त्यांनी सांगितले.

सावनेरमध्ये रद्द झाला होता भाजप प्रवेश

सावनेर नगरपरिषद निवडणूक रंगात आली असताना माजी मंत्री सुनील केदार यांच्या जवळचे व रेती तस्करीत सहभागी असलेल्या नरेंद्र पिंपळे व अमित राय यांचा भाजपमध्ये प्रवेश घडवून आणला होता. यावर जाहीर नाराजी व्यक्त करीत आ. डॉ. आशिष देशमुख यांनी पक्ष कार्यालयात आयोजित प्रचार बैठकीत संबंधित रेती तस्करांचे प्रवेश रद्द केले नाहीत तर महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता. आ. देशमुख यांच्या या नाराजीची लगेच दखल घेत राय व पिंपळे यांचा प्रवेश रद्द करण्यात आल्याचे जिल्हा भाजपकडून जाहीर करण्यात आले होते.

शंकर राऊत यांचा भाजप प्रवेश हे धक्कातंत्र

आमदार नाना पटोले यांचे विश्वासू असलेले शंकर राऊत यांचा अचानकपणे झालेला भाजप प्रवेश हे राजकीय धक्कातंत्र असल्याचे म्हटले जात आहे. भाजप नेते आमदार परिणय फुके व जिल्हाध्यक्ष आशू गोंडाणे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. राऊत यांच्या पक्षप्रवेशामुळे भंडारा जिल्ह्यात ओबीसी मतपेढीवरील काँग्रेसची पकड ढिली होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे नाना पटोले यांना हा राजकीय धक्का मानला जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : ED Raid to BJP Entry: Bhandara sand traders' entry sparks controversy.

Web Summary : Bhandara sand traders' BJP entry, following an ED raid on one businessman, stirred controversy. Parinay Fuke stated that admissions would be revoked if criminal backgrounds were found. Similar entry was cancelled in Savner due to public outrage.
टॅग्स :BJPभाजपाParinay Fukeपरिणय फुकेEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय