शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

बाल न्याय मंडळांची कर्तव्ये, भूमिका कार्यक्रम

By admin | Updated: February 8, 2016 00:42 IST

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा व जिल्हा महिला बाल विकास अधिकारी, भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने बाल न्याय मंडळ यांची कर्तव्ये,

भंडारा : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा व जिल्हा महिला बाल विकास अधिकारी, भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने बाल न्याय मंडळ यांची कर्तव्ये, भूमिका व जबाबदारी याविषयी शिबिर कार्यक्रम पोलीस बहुउद्देशिय सभागृह येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.कार्यक्रमाला प्रमुख अतिथी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जी.जे. अकर्ते, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव एम.एस. लोणे, मोहाडी येथील तिसरे सह दिवाणी न्यायाधीश आर.व्ही. डफरे, बाल न्यायमंडळ अध्यक्ष डॉ.विशाखा गुप्ते, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी एम.एम. आंबेडारे, जिल्हा वकील संघ, भंडारा, पोलीस पाटील, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, विशेष बाल पोलीस पथक व जिल्हा विधी सेवा प्राधिकराण कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक न्यायाधीश एम.एस. लोणे यांनी केले. त्यांनी बाल न्याय मंडळ यांची कर्तव्य, भूमिका व जबाबदारी याविषयी मार्गदर्शन केले.न्यायाधीश आर.व्ही. डफरे यांनी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण कक्ष यामध्ये बालकांना कशाप्रकारे त्याचे संगोपन केले जाते. जेणेकरून बाल गुन्हेगार हा समाजाच्या मुख्य प्रवाहात आणता येईल, याबाबत पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे मार्गदर्शन केले. डॉ.विशाखा गुप्ते, यांनी बाल न्याय मंडळ, बाल कल्याण समिती, विशेष बाल पोलीस पथक प्रतिनिधी, महिला बाल विकास अधिकारी, बाल संरक्षण कक्ष प्रतिनिधी, चाईल्ड लाईन व इतर बाल गुन्हेगारांसाठी वेगवेगळ्या समित्या व त्याचे संरक्षण कक्ष कशाप्रकारे कार्य करते, याविषयी स्लाईड शो द्वारे असे मार्गदर्शन केले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी बाल न्याय मंडळाची कर्तव्य, भूमिका व जबाबदारी याविषयी पोलिसांची भूमिका काय आहे, अशा गुन्ह्यामध्ये पोलिसांनी कोणती कार्य करावयला पाहिजे यावर प्रकाश टाकला. बाल गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी समाजातील प्रत्येक स्तरावर याची जाणीव जागृती कशाप्रकारे व्हायला पाहिजे, याबाबत पोलीस पाटील यांना योग्य ते दिशानिर्देश दिले. बालकांना गुन्हेगारीपासून दूर कसे ठेवता येईल यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. संचालन प्रभारी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी एम.एम. आंबेडारे यांनी केले. आभार प्रदर्शन न्यायाधीश एम.एस. लोणे यांनी केले. या कार्यक्रमाला २०० नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला. (नगर प्रतिनिधी)