शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रादिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
2
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
5
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
6
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
7
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
8
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
9
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
10
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
11
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
12
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
13
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
14
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
15
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
16
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
17
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
18
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
19
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
20
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीने 'मिनी मंत्रालय' पडले ओस

By admin | Updated: September 27, 2014 01:17 IST

सर्व सामान्यांच्या कामाचे हक्काचे ठिकाण म्हणून मिनी मंत्रायल म्हणजेच जिल्हा परिषदेला ओळखले जाते.

भंडारा : सर्व सामान्यांच्या कामाचे हक्काचे ठिकाण म्हणून मिनी मंत्रायल म्हणजेच जिल्हा परिषदेला ओळखले जाते. विधानसभा निवडणुकींचे बिगुल वाजल्याने पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेकडे पाठ फिरविली आहे. तर काहींनी स्वत:च उमेदवारी दाखल केल्याने त्यांना आता विधानसभेत पोहचण्याचे डोहाळे लागले आहे.जिल्हा परिषदेला ग्रामीण भागाच्या विकासाचा कणा संबोधल्या जाते. याला मिनी मंत्रालय म्हणून ओळख आहे. अशा मिनी मंत्रायलयातून राजकारणाची कास धरलेल्या अनेकजणांनी विधानसभेत प्रवेश केला आहे. याच धर्तीवर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेच्या काही विद्यमान पदाधिकाऱ्यांनीही आपले नशीब अजमाविण्यासाठी उमेदवारी दाखल केली आहे. निवडणुका होणार असल्याने अनेक दावेदारांनी आपल्या विजयाच्या गणितांची गोळाबेरीज केली आहे. काहींनी जातीच्या तर काहींनी केलेल्या विकासोपयोगी कामाच्या भरोशावर त्यांची उमेदवारी कशी प्रबळ राहिल हे पटवून दिले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे आता शेवटचे दिवस उरले आहेत. तसतसे पक्षांनी जाहिर केलेले तर काही बंडोबांनीही आपले उमेदवारी अर्ज सादर करून एकमेकांसमोर आवाहन उभे केले आहे. या निवडणुकीचा ज्वर आता जिल्हा परिषदेतही दिसू लागला आहे. शुक्रवारी जिल्हा परिषदेचा फेरफटका मारला असता, अर्थ व बांधकाम सभापती वगळता अध्यक्ष, उपाध्यक्षांसह अन्य सभापतींचे कक्ष रिकामे दिसून आले. मुळात हे पदाधिकारीच जिल्हा परिषदेकडे आज भटकले नाही. हे पदाधिकारी त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेकरिता किंवा राजकीय गोळाबेरीज जमविण्यात मशगुल असल्याने त्यांनी जिल्हा परिषदेकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. पदाधिकाऱ्यांसह जिल्हा परिषद सदस्यांचीही हजेरी आता बोटावर मोजण्या इतकी दिसून येत आहे. विधानसभा निवडणुकीमुळे ग्रामीण भागातून जिल्हा परिषदेत कामासाठी येणाऱ्यांना त्यांचे पदाधिकारी किंवा जिल्हा परिषद सदस्य भेटत नसल्याने त्यांची कामे खोळंबून असल्याने आल्यापावली परतावे लागत आहे.ऐरवी पदधिकारी नेहमी जिल्हा परिषदेत उपस्थित राहत असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांचा लवाजमा व शासकीय कामे करणाऱ्यांची मोठी भाऊगर्दीने फुलण जाणारी जिल्हा परिषद आता निवडणुकीमुळे ओस पडल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. (शहर प्रतिनिधी)