शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
4
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
7
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
8
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
9
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
10
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
11
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
12
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
13
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
14
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
15
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
16
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
17
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
18
मराठी भाषेसाठीचा कायदा काय सांगतो?; व्यवहारात वापर वाढवणे ही प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी
19
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
20
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांअभावी रूग्णसेवा वाऱ्यावर

By admin | Updated: September 12, 2016 00:29 IST

देव संकटाचे वेळी धावून येत असल्याची श्रध्दा आहे. त्यासाठी देवाची आराधना केली जाते.

रुग्णांची हेळसांड : करडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वास्तवकरडी (पालोरा) : देव संकटाचे वेळी धावून येत असल्याची श्रध्दा आहे. त्यासाठी देवाची आराधना केली जाते. तशीच अवस्था सध्या करडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णही करीत आहेत. ती रुग्णांच्या देव म्हणून मान्यता असलेल्या डॉक्टरांची गेल्या वर्षभरापासून येथील रुग्णांच्या मंदिरातील दोन्ही डॉक्टर बेपत्ता आहेत. सहकाऱ्यांचीही सात पदे रिक्त आहेत. डॉक्टरांची रुग्णांना तास्नतास वाट पहावी लागते. अनेकदा विनंती, मागणी याकडे दुर्लक्ष केले जात आहे.करडी प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्याचा बोजवारा उडाला आहे. संपूर्ण आरोग्य यंत्रणेचेच आरोग्य बिघडल्यासारखी अवस्था आहे. सन २०१५ पासून येथील वैद्यकिय अधिकाऱ्यांचे पद रिक्त आहे. मुंढरी येथील आयुर्वेदिक दवाखान्याचे वैद्यकिय अधिकारी डॉ. पुंडलिक डोंगरवार यांचेकडे प्रभार सोपवून आरोग्य प्रशासन चैनित आहे. सहायक वैद्यकिय अधिकारी म्हणून काही काळासाठी असलेले डॉ. गभणे यांनी सुध्दा २० दिवसाअंगोदर काढता पाय घेतला आहे. त्यामुळे वैद्यकिय अधिकारी वर्गांची दोन्ही पदे रिक्त आहेत.करडी प्राथमिक आरोग्य केंद्र हे परिसरातील ४५ हजार लोकसंख्येसाठी एकमेव सुविधा केंद्र आहे. दुसरी आरोग्याची सुविधा येथील नागरिकांसाठी नाही. त्यामुळे येथील आरोग्य केंद्राची रोजची ओपीडी २०० ते २५० नागरिकांची असते. बाळतपण होण्याचे प्रमाणही येथे अधिक आहे. नाईलाजाने नागरिकांना बोगस डॉक्टरांकडे धाव घेवून बेभरश्याचा इलाज करावा लागत आहे. या केंद्रापासून भंडारा, तुमसर, मोहाडी, साकोली आदी शहराचे अंतर ३५ ते ४५ किमीचे आहे. त्यामुळे लहान लहान कारणासाठी कर्जबाजारी होवून नागरिकांना शहराकडे धाव घ्यावी लागत आहे. आर्थिक व मानसिक त्रासाला बळी पडावे लागत आहे. वर्षभरापासून डॉक्टरांची मागणी सातत्याने केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस करडीच्या वतीने ‘जवाब दो’ आंदोलन करण्यात आले. अनेकदा पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र गरीबांचा देव असलेले डॉक्टरांची येथे नियुक्ती करण्यात आली नाही. प्रभारी डॉ. आपल्या आरोग्य केंद्रातील काम सांभाळून दुपारच्या सुमारास येथे पोहचतात. त्यामुळे तासनतास त्यांची वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्याय येथील रुग्णांकडे नाही. गणेश चतुर्थी देव देवळात येणार असे सर्वांना वाटत होते. मात्र अनंत चतुर्थी जवळ असतांना अजुनही त्यांची पावले पडण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे नागरिकांचा हिरमोड झालेला पहावयास मिळत आहे. (वार्ताहर)सात कर्मचाऱ्यांची पदे रिक्तकरडी आरोग्य केंद्रात दोन डॉक्टरांच्या पदाशिवाय ओपीडी आरोग्य सेविकेचे एक पद, जेएनएमचे दोन पद तर आरोग्य सहायकाचे एक पद वर्षभरापासून रिक्त आहे. केंद्राअंतर्गत असलेल्या निलज बुज उपकेंद्रात आरोग्य सेवक व सेविकेचे दोन पद रिक्त आहे तर करडी उपकेंद्रात आरोग्य सेवकाचे एक पद रिक्त आहे. रिक्त ७ पदाची माहिती वेळोवेळी प्रशासनाला देण्यात आली. मात्र, जिल्ह्यात वैद्यकिय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याचे कारण वारंवार जिल्हा आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून दिले जाते. नव्याने भरतो झाल्याशिवाय किंवा डॉक्टर शासनाने उपलब्ध करुन दिल्याशिवाय पर्याय नसल्याची हतबलता प्रशासनाकडून व्यक्त केली जाते. शासनातील लोकप्रतिनिधींचे आवश्यक गरजेकडे दुर्लक्ष होत आहे. आमदार महोदयांनी प्रकरणी लक्ष घालण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.करडी प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन्ही वैद्यकिय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. तसेच करडी केंद्र व उपकेंद्रात सात कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. मुंढरी केंद्राचे काम सांभाळून करडी केंद्राचे कामकाज केले जाते. त्यामुळे थोडा उशिर होते. रिक्त पदांची माहिती शासन -प्रशासनाला वारंवार देण्यात आली आहे. रुग्णांची त्यामुळे गैरसोय होत आहे.- पुंडलिक डोंगरवार,प्रभारी वैद्यकिय अधिकारी करडी