शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

डीएसओ म्हणतात, केरोसीनच्या काळाबाजाराची माहिती द्या

By admin | Updated: November 28, 2015 01:37 IST

तूर डाळ काळाबाजारी करणाऱ्यांवर जिल्हा पुरवठा विभागाने जिल्ह्यातील अनेक व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठानांवर छापे घातले.

डाळीच्या धाडसत्रावर पांघरूण : हिवाळी अधिवेशनात प्रकरण गाजणार, अहवालात होणार फेरबदलप्रशांत देसाई भंडारातूर डाळ काळाबाजारी करणाऱ्यांवर जिल्हा पुरवठा विभागाने जिल्ह्यातील अनेक व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठानांवर छापे घातले. कारवाईच्या नावावर अर्थपूर्ण व्यवहार करून प्रकरण दडपण्यात आले. याबाबत ‘लोकमत’ने ‘कारवाईच्या नावावर अधिकाऱ्यांची शिजली डाळ’ या आशयाचे वृत्त प्रकाशित केले. या वृत्तामुळे पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर पांघरूण घालण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी बनसोडे म्हणतात, डाळीची साठेबाजरी सोडा, केरोसीनच्या काळाबाजाराची माहिती द्या.राज्यात कधी नव्हे ती, यावर्षी तूर डाळीच्या दरात विक्रमी वाढ झाली. याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसला. त्यांच्या जेवनातून वरण गायब झाल्याचे चित्र दिसू लागले. डाळ विक्रेत्यांकडून साठेबाजी करण्यात आल्याने डाळीचे भाव वाढल्याचे लक्षात येताच अन्न व पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी अधिनस्थ अधिकाऱ्यांवर साठेबाजारंवर छापे घालण्याचे आदेश दिले होते. डाळीच्या साठेबाजीचे लोण राज्यभर असल्याने भंडारा जिल्ह्यातही पुरवठा विभाग व तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या भरारी पथकांनी जिल्ह्यातील व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठांवर दिवाळीदरम्यान छापे घातले. ही कारवाई या अधिकाऱ्यांनी दिवसरात्र एक करून केली. कारवाईसाठी शासकीय वाहनांचा वापर करण्यात आला. यावर हजारो रूपयांचा इंधन खर्च करूनही एक छदामही तूर डाळ जप्त करण्यात विभागाच्या पथकाला यश आले नाही. विशेष म्हणजे, या पथकाने अनेक व्यापाऱ्यांना साठेबाजीच्या नावावर अक्षरश: वेठीस धरले. कारवाईच्या नावावर त्यांच्याकडून व्यवहार करून साठेबाजी नसल्याचे दाखवून कारवाई न करताच रिकाम्या हाताने परतले. दिवाळीसारखा सणात या कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याने व्यापाऱ्यांनीही गप्प राहणेच पसंत केले. मंत्र्यांचे अधिकारी ऐकत नसल्याचा यापेक्षा आणखी दुसरा दाखला होवू शकत नाही.