मद्यपीने लावली घराला आग

By Admin | Updated: June 24, 2016 01:22 IST2016-06-24T01:22:24+5:302016-06-24T01:22:24+5:30

एका मद्यपीने स्वत:च्या घराला आग लावली. यात घराचे साहित्य जळून खाक झाले. सुमारे एक लाखाचे विविध साहित्य आगीत राख झाले.

A drunken house fire | मद्यपीने लावली घराला आग

मद्यपीने लावली घराला आग

तुमसर : एका मद्यपीने स्वत:च्या घराला आग लावली. यात घराचे साहित्य जळून खाक झाले. सुमारे एक लाखाचे विविध साहित्य आगीत राख झाले. आगीनंतर मुलांना जाळले असा आरडाओरड केल्याने परिसरात एकच खळबळ माजली होती. घटनास्थळी अग्नीशमन पथक तथा पोलीस दाखल झाले. सुदैवाने घरात अन्य सदस्य नव्हते. पोलिसांनी मद्यपीला ताब्यात घेतले.
श्रीराम नगरातील रहिवाशी शोभेलाल पारधी (४७) याने बुधवारी दुपारी २ च्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत स्वत:च्या घराला आग लावली व स्वत: खोलीत काही वेळ थांबला. घरातून धूर निघतानी घराजवळील नागरिक धावून गेले तेव्हा मद्यपी शोभेलाल याने मी स्वत:च आग लावली व घरात कुटूंबियांना जाळले असे सांगू लागला. यामुळे परिसरात एकच खळबळ माजली.
या घटनेची माहिती अग्नीशामक विभाग व तुमसर पोलिसांना स्थानिकांनी दिली. तुमसर नगरपरिषदेचे अग्नीशामक पथक व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण प्रस्थापित करण्यात आले. दरम्यान शोभेलाल यांच्या घरातील सोफासेट, टी.व्ही. संगणक, होम थियेटर आणीत भस्म झाले. सुमारे एक लाखाचे नुकसान झाले. शोभेलाल यांची पत्नी व दोन मुली लाखनी येथे गेल्या होत्या. घरात व भाडेकरू यांच्याकडे गॅस सिलिंडर सुरू होता. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. शोभेलाल याला तुमसर पोलिसांनी ताब्यात घेतले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: A drunken house fire