शहरं
Join us  
Trending Stories
1
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
2
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
3
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
4
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
5
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
6
धार भोजशाळा 'सरस्वती मंदिर'च! HC कडून हिंदूंना पूजेचा अधिकार, नमाजचा आदेश रद्द; आली मुस्लीम पक्षाची पहिली प्रतिक्रिया
7
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
8
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
9
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
10
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
11
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
12
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
13
सावधान! स्मार्टफोनचा रिकामा डबा कचरा समजून फेकून देताय? थांबा, मिळू शकतो लाखोंचा फायदा
14
"एकतर तहासाठी तयार व्हा अथवा विनाशाचा सामना करा, ५ मिनिटांत..."; चीन दौऱ्यावरून परतताना ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
15
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
16
Adhik Maas 2026: अधिक मासाला 'धोंड्याचा' मास म्हणण्यामागे काय आहे नेमके कारण?
17
इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या, पण 'या' ५ बाईक महागाईच्या काळातही ठरतील संकटमोचक!
18
इन्स्टाग्रामचं नवीन 'Instants' फीचर डोकेदुखी ठरतंय? 'या' सोप्या स्टेप्स फॉलो करून लगेच करा बंद!
19
तुमच्या लोकांना कोर्टाबाबत बेजबाबदार विधान करण्यापासून थांबवा; न्यायाधीशांनी ठाकरेंच्या वकिलांना सुनावलं
20
Zerodha च्या निखिल कामथ यांनी 'या' कंपनीत वाढवली गुंतवणूक, वृत्तानंतर स्टॉकमध्ये १८ टक्के तेजी
Daily Top 2Weekly Top 5

स्वप्नपूर्ती शेतकऱ्यांचे स्वप्न साकारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 06:00 IST

तुमसर - बपेरा राज्य मार्गावरील सिंदपुरी गावात प्राथमिक शिक्षण घेणारे पवन कटनकार हा तरुण अभियंता आहे. शहरातील खासगी कंपनीची नोकरी सोडून गावात परतल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांचे विकास शेती उत्पादनात बदल तथा जैविक खतांचा वापर करण्याकरिता स्वप्नपूर्ती डेअरी आणि बायोप्रोडक्टस् नावाची गावात संस्था स्थापन केली. या संस्थेअंतर्गत पशुपालन आणि कुक्कुटपालन व्यवसाय सुरु केला आहे.

ठळक मुद्देगावात रोजगार निर्मिती : अभियंता तरुणाचे प्रयत्न सुरु, उत्पादन निर्मितीचा संकल्प

रंजित चिंचखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : शहरात अभियंता पदावर खाजगी कंपनीत कार्यरत असताना लठ्ठ पगारांची नोकरी सोडून गावात शेती आणि पशूपालन व्यवसायातून रोजगार निर्मिती करणाऱ्या २९ वर्षीय तरुणाचे नाव आहे पवन कटणकार रा.सिंदपुरी. या तरुणाने स्वत: उत्पादन तयार करीत अनेक शहरात विक्री केरीत आहे.
तुमसर - बपेरा राज्य मार्गावरील सिंदपुरी गावात प्राथमिक शिक्षण घेणारे पवन कटनकार हा तरुण अभियंता आहे. शहरातील खासगी कंपनीची नोकरी सोडून गावात परतल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांचे विकास शेती उत्पादनात बदल तथा जैविक खतांचा वापर करण्याकरिता स्वप्नपूर्ती डेअरी आणि बायोप्रोडक्टस् नावाची गावात संस्था स्थापन केली. या संस्थेअंतर्गत पशुपालन आणि कुक्कुटपालन व्यवसाय सुरु केला आहे. हे दोन्ही व्यवसाय एकमेकांना पुरक आहेत. गाईच्या शेणापासून त्यांनी गांढूळ खत निर्मिती केली. त्यांनी तसा प्लांट निर्माण केला आहे. या खतांची विक्री स्वप्नपूर्ती नावाने राज्याचे अनेक शहरात विक्री होत आहे. गाईच्या शेण आणि गोमुद्रापासून अनेक उत्पादन तयार करण्याकरिता त्यांनी पुढाकार घेतला आहे. शेण आणि गोमुत्रापासून मच्छर अगरबत्ती, धूपबत्ती, फ्लोअर क्लीनर, अ‍ॅशवॉश डिश वॉश, शेण, गोमुत्र सारखे उत्पादन तयार केली आहेत. शेण, गोमुत्र आणि वनस्पतीपासून तयार करण्यात आलेल्या उत्पादनाला बाजारात मागणी आहे. गांढूळ खत शेतीला लायदा करणार असल्याने स्वस्त दरात शेतकऱ्यांना उपलब्ध करीत आहे. गावात शेतकऱ्यांकडे पशूपालन असताना गांढूळ खत निर्मिती करण्यात येत नाही. शेतकऱ्यांना गांढूळ खत निर्मितीचे खडे पवन देत आहे. याशिवाय अनेक पीक पद्धतीतून शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य उंचाविण्याकरिता प्रयत्न करीत आहेत. प्रायोगीक तत्वावर पवनने स्वत:चे शेतीत काळ्या तांदळाचे उत्पादन घेतले. या तांदळापासून अनेक बाजारावर उपाययोजना करता येतो. या शिवाय आरएनआर १५०४८ वाणाची रोवणी चार एकरात केली. शुगरफ्री असल्याने आरोग्यास लाभ देणारे तांदूळ आहे. या तांदळाचे भरीव उत्पादन त्यांनी घेतले. सध्या गोवऱ्यांची मागणी फार मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु गावातून गोवऱ्यांची निर्मिती नामशेष होण्याचे मार्गावर आहे. गोवऱ्या व्यवसायातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीचे प्रयत्न सुरु केले आहो. उत्तरप्रदेश, मराठवाडा व अन्य प्रांतात गोवऱ्यांना मोठी मागणी आहे.

बायोगॅस प्रकल्पातून शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. शेणविक्रीतून त्यांना आर्थिक फायदा होईल. याशिवाय त्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.
-पवन कटनकार, सचिव, स्वप्नपूर्ती डेअरी, सिंदपुरी.

टॅग्स :Farmerशेतकरी