शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

जादूटोण्याच्या संशयावरून दांपत्यास मारहाण

By admin | Updated: October 16, 2016 00:28 IST

जादूटोणा केल्याच्या संशयावरून टिळक वॉर्डातील एका दांपत्यास जबर मारहाण करण्यात आली असून...

पत्रपरिषद : आरोपीवर कडक कारवाईची मागणी मोहाडी : जादूटोणा केल्याच्या संशयावरून टिळक वॉर्डातील एका दांपत्यास जबर मारहाण करण्यात आली असून त्या दांपत्यांचा जिल्हा शासकीय रुग्णालयात दहा दिवसांपासून उपचार सुरु आहे. मारहाण करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई न केल्यास भव्य मोर्चा काढण्यात येईल. तसेच होणाऱ्या परिणामास प्रशासनाला जबाबदार ठरविण्यात येईल, असा इशारा पत्रपरिषदेत उपस्थित भूमेश्वर श्रीपाद व अन्य व्यक्तींनी दिला आहे.मोहाडी येथील टिळक वॉर्डात राहणारे वामन श्रीपाद हे कापड विक्रीचा व्यवसाय करतात. वामन श्रीपाद यांच्या शेजारी शालीक न्यायखोर कुटुंबासह राहतात. काही दिवसांपासून त्यांचा मुलगा सचिन न्यायखोर यांचा कान दुखत असल्याने त्याच्यावर वामन श्रीपाद यांनी जादूटोणा, करणी केली आहे, असे एका बाबाने सांगितल्याने प्र्रकाश न्यायखोर, शालीक न्यायखोर व सचिन न्यायखोर यांनी ८ आॅक्टोबरला वामन श्रीपाद यांच्या घरी येऊन शिवीगाळ केली. तसेच वामन श्रीपाद यांना ५०० फुट दूर ओढत नेले व तिथे काठीने व लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. त्यामुळे त्यांच्या डाव्या पायाचे हाड क्रॅक झाले व मारहाणीमुळे ते बेशुद्ध पडले. त्यांची पत्नी भांडण सोडवायला आली असता तिलाही जबर मारहाण करण्यात आली. या दांपत्यांना त्वरीत सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.यापूर्वीही १ जुलै रोजी याच आरोपींनी घरी येऊन धमकी दिली होती. त्याची तक्रार मोहाडी पोलीस स्टेशन तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक भंडारा यांना करण्यात आली होती व गैरअर्जदारावर कारवाईची मागणी करण्यात आली होती. मात्र पोलिसांनी त्या तक्रारीला गंभीरतेने घेतले नाही. त्यामुळेच सदर आरोपींची हिंमत वाढून त्यांनी जबर मारहाण केली. परंतु मारहाण करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अजूनपर्यंत अटकच केली नाही. जर जादूटोण्याच्या संशयावरून मारहाण करणाऱ्या आरोपीवर सात दिवसात कठोर कारवाई करण्यात आली नाही तर पोलीस स्टेशनवर भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशारा पत्रपरिषदेत उपस्थित भूमेश्वर श्रीपाद, नगरपरिषद अध्यक्ष स्वाती निमजे, नगरसेवक अरुणा श्रीपादसह अनेक नागरिकांनी दिला आहे. या प्रकरणात मोहाडी येथे कलम ३२४, २९४, ३४ भादंवि तसेच आर.डब्लू. महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधक कायदा ३(१), ३ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.(शहर प्रतिनिधी) आरोपी विरोधात पुरावे गोळा करणे सुरु असून सविस्तर तपास करण्यात येत आहे. लवकरच त्यांना अटक करण्यात येईल.- सुहास चौधरीठाणेदार, मोहाडी