शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

जलाशयातील दरवाजा कोसळला

By admin | Updated: September 25, 2014 23:17 IST

सिहोरा परिसरातील खरीप हंगामात धान पिकाला चांदपूर जलाशयाचे पाणी वाटप करताना चिकारचे जीर्ण दरवाजा कोसळला आहे. यामुळे पाणी वाटप प्रभावित झाले आहे.

धान पिकाला पाणी नाही : खरीप हंगामात पाणी वाटप प्रभावितचुल्हाड/सिहोरा : सिहोरा परिसरातील खरीप हंगामात धान पिकाला चांदपूर जलाशयाचे पाणी वाटप करताना चिकारचे जीर्ण दरवाजा कोसळला आहे. यामुळे पाणी वाटप प्रभावित झाले आहे. सिहोरा परिसरात १० हजार हेक्टर आर शेतीला सिंचित करण्याची क्षमता विस्तीर्ण चांदपूर जलाशयात आहे. परंतु जलाशयात पाणी साठवणुक होत नाही. याशिवाय जलाशयाचे खोलीकरण करण्यात न आल्यामुळे ८ हजार हेक्टर शेतीला पाणी वाटप करण्यात येत आहे. परिसरातील अधिकाधिक शेती ओलीताखाली आणण्यासाठी बावनथडी नदीवर ११० कोटी खर्चून सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प साकारण्यात आला आहे. या प्रकल्पाचे पावसाळ्यात उपसा करण्यात आलेले पाणी चांदपूर जलाशयात साठवणूक करण्यात येत आहे. कोट्यवधीचा प्रकल्प साकारताना १४ हजार ९३८ हेक्टर सिंचित क्षेत्र निर्धारित करण्यात आलेला आहे. परंतु आजवर निर्धारित क्षेत्रात पाणी वाटप करता आले नाही. विस्तीर्ण चांदपूर जलाशयाची निर्मिती ब्रिटीश कालीन आहे. जलाशयाची पाळ आणि चिकार (ढोला) चे बांधकाम ब्रिटीश राजवटीत झाले आहे. जलाशयाची पाळ व चिकारला १०७ वर्ष झाले आहेत. सध्या स्थित पाणी वाटप करणारा चिकार ढोला जीर्ण झालेला आहे. याच चिकार मधून १० हजार हेक्टर आर शेतीला पाणी वाटप करताना पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.पाणी वाटप करताना चिकारचे दरवाजे उघडताना यंत्रणेला जिकरीचे ठरत आहे. पाणी वाटपात चिकारमध्ये कंपन होत असल्याने यंत्रणा भयभित होत आहे. जीर्ण चिकार कधी कोसळेल याचा नेम नाही. यासंदर्भात नव्याने चिकार ढोला बांधकाम करावे, याचा पाठपुरावा ‘लोकमत’ने केला आहे. चिकार कोसळल्यास ८-१० गावांना संकटाचा सामना करावा लागणार आहे. यंदा खरीप हंगामातील धान पिकाला पाणी वाटपाची प्रक्रिया दि.१८ पासून सुरू करण्यात आलेली आहे. डावा आणि उजवा कालवा अंतर्गत ८,१०० हेक्टर आर शेतीला पाणी वाटप करण्यात येत आहे. हे पाणी वाटप करताना चिकारचा लोखंडी दरवाजा उघडण्यात आलेला आहे. दरम्यान पाणी वाटप सुरू असताना दि.१९ ला सकाळी ८ च्या सुमारास जीर्ण दरवाजा कोसळला आहे. लोखंडी साखळी तुटली असल्याने पाणी वाटप बंद झाले आहे. २४ तासात कालवे बंद झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. लघु पाठबंधारे विभागाच्या यंत्रणेने तुटलेला दरवाजा उघडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केला आहेत. तुमसरचे वर्क शॉप कामगाराची यात मदत घेण्यात आली आहे. ४८ तासानंतर यात यश आले असून तुटलेला दरवाजा बाहेर काढण्यात आलेला आहे. चिकारला आता दरवाजा नसल्याने संपूर्ण ३० फूट पाण्याचा विसर्ग होणार आहे. मध्यंतरी दरवाजा बंद करून पाणी अडविण्याची प्रक्रिया नाही. जलाशयातील संपूर्ण पाणी रिकामे करण्याची वेळ यंत्रणेवर आली आहे. कालवे, नहर पाण्याने भरून वाहत आहे. दरवाज्याविना चिकार उभा आहे. (वार्ताहर)