डॉक्टरची अटकपूर्व जामिनासाठी धाव; भंडारा येथील बाळ विक्री प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 13:12 IST2026-02-13T13:11:26+5:302026-02-13T13:12:28+5:30

Bhandara : दहा दिवसांच्या बालिकेच्या विक्री प्रकरणात फरार असलेला गोंदियातील डॉ. नितेश वाजपेयी सध्या अज्ञातवासात असून अटकपूर्व जामिनासाठी धावाधाव करीत आहे.

Doctor seeks anticipatory bail; Bhandara baby sale case | डॉक्टरची अटकपूर्व जामिनासाठी धाव; भंडारा येथील बाळ विक्री प्रकरण

Doctor seeks anticipatory bail; Bhandara baby sale case

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा :
दहा दिवसांच्या बालिकेच्या विक्री प्रकरणात फरार असलेला गोंदियातील डॉ. नितेश वाजपेयी सध्या अज्ञातवासात असून अटकपूर्व जामिनासाठी धावाधाव करीत आहे. भंडारा जिल्हा सत्र न्यायालयात आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे त्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे, तर पोलिसांनीही जामीन रद्द करण्यासाठी दोन्ही न्यायालयांकडे अर्ज केला आहे.

दहा दिवसांच्या बालिकेची विक्री डॉक्टरच्या माध्यमातून झाल्याच्या या प्रकारामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी डॉक्टरसह पाचजणांवर गुन्हे दाखल केले. लालेश्वरी नंदकिशोर सदेपाच (वय ३९) या महिलेला अटक केली आहे. पोलिसांच्या मते, या बाळाच्या विक्री प्रकरणात एजंट म्हणून तिचा सहभाग आहे.

पोलिसांच्या चौकशीत तिने पांढरबोडी (ता. भंडारा) येथील मालती प्रकाश वाघमारे या महिलेला हे बाळ तीन लाख रुपयांत विकल्याचे पुढे आले आहे. त्यापैकी एक लाखाचा धनादेश असून, दोन लाख रुपये रोखीने घेतल्याचे व एक लाख स्वतःकडे ठेवून एक लाख रुपये डॉक्टरला दिल्याचेही चौकशीत पुढे आले आहे.

आरोपीच्या दवाखाना आणि घराची झडती

गुरुवारी, १२ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी फरार आरोपी डॉ. नितेश वाजपेयीच्या रुग्णालय आणि घरी झडती घेतली. त्याच्या नातेवाइकांचीही चौकशी केली. फरार आरोपींच्या शोधासाठी चार पथके तयार करण्यात आली असून, तपास सुरू आहे. लवकरच त्यांचा शोध घेतला जाईल, असा विश्वास जिल्हा पोलिस अधीक्षक नुरूल हसन यांनी व्यक्त केला.

यापूर्वी एका बाळाची विक्री

यापूर्वीही अशाच प्रकारातून एका बाळाची विक्री झाल्याचे पोलिसांच्या चौकशीत उघड झाले आहे. अटकेत असलेल्या लालेश्वरी या महिलेने तशी माहिती दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. गरीब कुटुंब हेरून ही टोळी असा प्रकार करायची. ज्या कुटुंबात तीन किंवा त्यापेक्षा अधिक मुले असतील, त्यांना गाठून बाळाची विक्री केली जायची.

मोठ्या रॅकेटचा सहभाग

जिल्हा पोलिस अधीक्षक नुरूल हसन यांनी या प्रकारामागे मोठ्या रॅकेटचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणी आतापर्यंत पाचजणांवर गुन्हे नोंदविण्यात आले असले तरी, यात पुन्हा काही व्यक्तींचा समावेश असण्याची शक्यता आहे. चौकशीसाठी दोन महिलांना नोटीस देण्यात आली आहे.

Web Title : भंडारा शिशु विक्रय मामले में डॉक्टर की अग्रिम जमानत याचिका

Web Summary : भंडारा में शिशु विक्रय रैकेट में शामिल एक डॉक्टर अग्रिम जमानत की मांग कर रहा है। पुलिस ने एक महिला को गिरफ्तार किया और दस दिन के बच्चे को ₹3 लाख में बेचने में शामिल अन्य लोगों की तलाश कर रही है। जांच से पता चला कि यह रैकेट गरीब परिवारों को निशाना बनाता था।

Web Title : Doctor Seeks Anticipatory Bail in Bhandara Baby Selling Case

Web Summary : A doctor involved in a baby selling racket in Bhandara is seeking anticipatory bail. Police arrested one woman and are searching for others involved in the sale of a ten-day-old baby for ₹3 lakh. Investigation reveals a larger racket targeting poor families.