शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही एकटे समजू नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत

By admin | Updated: November 27, 2015 00:49 IST

नक्षलवाद देशाला घातक आहे. आपल्यातलेच आपले बहिण-भाऊ नक्षल चळवळीत सामील होत आहेत.

महानिरीक्षक कदम यांचे आवाहन : पालांदुरात श्रद्धांजली कार्यक्रमात शहीद जवानांच्या कुटुंबाचा सत्कारपालांदूर : नक्षलवाद देशाला घातक आहे. आपल्यातलेच आपले बहिण-भाऊ नक्षल चळवळीत सामील होत आहेत. नक्षल्यांना लोकशाही मान्य नाही. गेली ३० वर्षे आम्ही त्यांच्याशी लढतो आहोत. कित्येक जवान शहीद झाले. त्यांची आठवण आपल्याला ठेवायची गरज आहे. शहीद जवानांच्या कुटुंबीयांनी एकटे समजू नये. संपूर्ण पोलीस दल तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे, असा विश्वास विशेष पोलीस महानिरीक्षक रविंद्र कदम यांनी दिला.खासदार नाना पटोले मित्र परिवाराच्यावतीने पालांदूर येथे आयोजित २६/११ च्या शहीद जवानांना श्रध्दांजली कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, आमदार बाळा काशिवार, जिल्हाधिकारी धीरजकुमार, प्रभारी पोलीस अधीक्षक डॉ.संदिप पखाले, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी विनोद पटोले, जि.प. सदस्य वर्षा हुमणे, उपसभापती विजय कापसे, सरपंच शुभांगी मदनकर, सरपंच वैशाली खंडाईत, वंदना गवळे, दामाजी खंडाईत, वसंत शेळके, हेमराज कापसे, कृष्णा जांभूळकर, कृष्णा धकाते, मोरेश्वर खंडाईत, सुदाम खंडाईत उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी धीरजकुमार म्हणाले, देशाच्या संरक्षणाकरिता शहीद झालेल्या वीरपुत्रांचे बलिदान व्यर्थ जावू देऊ नका, प्रत्येकांनी प्रामाणिकपणे देशसेवा, मातृसेवा घडविण्याची ईच्छा बाळगावी, हा देश माझा आणि या मी देशाचा हे लक्षात ठेऊन एकनिष्ठेने समाजात आपुलकीने जगा. जगाच्या इतिहासात डॉ.बाबासाहेबांनी दिलेले संविधान आदर्श आहे. त्याचा सन्मान करण्याची जबाबदारी प्रत्येकांची आहे. २६/११ ची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सजग राहण्याची गरज आहे. यावेळी देशाकरिता प्राणांची आहुती देणाऱ्या शहीद ईशांत भुरे यांचे वडील रामरतन भुरे यांचा शहीद सदाशिव शेळके यांची पत्नी शारदा शेळके यांचा शहीद अंबेराज बिसेन एकोडी यांची पत्नी अंजली बिसेन यांचा शहीद रविंद्रकुमार जंवजाळ यांची पत्नी योगीता जंवजाळ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अनेकांना हुंदके आवरता येत नव्हते. यावेळी देशभक्तीपर गीताने अख्खा परिसर भावूक झाला होता. तत्पूर्वी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व वैराग्यमूर्ती गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व हुतात्म्यांना पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी पोलीस विभागाने मानवंदना दिली. यावेळी खराशी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, देशभक्तीपर गीत सादर करीत उपस्थितांची मने जिंकली.प्रास्ताविकात भरत खंडाईत म्हणाले, राजकारणात राहून समाजसेवा घडावी, हुतात्म्याचे स्मरण करावे, देशप्रेमाची जाणीव व्हावी आणि गावाची आदर्शाकडे वाटचाल व्हावी या हेतूने हा कार्यक्रम मागील आठ वर्षांपासून आयोजित करीत असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे बहारदार संचालन मुख्याध्यापक मुबारक सय्यद यांनी केले. आभारप्रदर्शन न्यायाहारवाणीचे सरपंच रत्नाकर नागलवाडे यांनी केले. या कार्यक्रमाला खासदार नाना पटोले मित्र परिवार आणि पालांदूर जिल्हा परिषद क्षेत्र आणि गावातील बहुसंख्य तरुणांनी सहकार्य केले. (वार्ताहर)चिमुकलीने दिली संविधानाची शपथसंविधान दिनाच्यानिमित्त जिल्हा परिषद अंगणवाडीची तीन वर्षे वयाची चिमुकली मृणाली चंद्रभान झलके हिने उपस्थितांना संविधानाची शपथ देताना सर्वांनी टाळ्यांचा जयघोष करीत तिचे कौतुक केले. ५१ तरुणांनी केले रक्तदानदेशाप्रती आपुलकीची भावना तेवत राहावी या उद्देशाने आयोजित रक्तदान शिबिरात ५१ तरुणांनी रक्तदान करुन शहीदांप्रति कृतज्ञता व्यक्त केली. या सर्व तरुणांचे आयोजकांसह अतिथींनी अभिनंदन केले. पोलीस महानिरीक्षक रविंद्र कदम, जिल्हाधिकारी धीरजकुमार, आमदार बाळा काशीवार, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी विनोद पटोले यांचे कुंकुम तिलकने सरंपच वैशाली खंडाईत यांनी स्वागत केले.