जिल्हाधिकाऱ्यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 12:18 AM2017-11-16T00:18:02+5:302017-11-16T00:18:34+5:30

विविध उपक्रमात विद्यार्थी मनापासून भाग घेतात. उत्कृष्ट कार्य करतात.

The district collector communicated with the students studied | जिल्हाधिकाऱ्यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

जिल्हाधिकाऱ्यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

Next
ठळक मुद्देएक दिवस विद्यार्थ्यांसोबत उपक्रम : मोहगाव देवी शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : विविध उपक्रमात विद्यार्थी मनापासून भाग घेतात. उत्कृष्ट कार्य करतात. त्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत बालकदिनी ‘एक दिवस विद्यार्थ्यांसोबत’ हा नाविण्यपूर्ण उपक्रम मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी यांनी राबविला. याशिवाय जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी महात्मा ज्योतिबा फुले हायस्कुल व जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मोहगाव देवी येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
जिल्ह्यात बºयाच शाळांमध्ये नवोपक्रम राबविले जातात. ते नवोपक्रम शाळांपुरते मर्यादित राहतात. त्या नवोपक्रमाची दखल क्वचितच घेतली जाते. परंतु मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यवंशी यांनी ‘एक दिवस विद्यार्थ्यांसोबत’ हा नाविण्यपूर्ण उपक्रम सुरु केला. मोहगाव देवी येथे पाणीपुरवठा व्हावा यासाठी सूर नदीवर वनराई बंधारा तयार करण्यात यावा, असा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. सुर्यवंशी यांनी ही संकल्पना वास्तवात आणली.
सप्टेंबर महिन्यात महात्मा ज्योतिबा फुले हायस्कुल मोहगाव देवी, जिल्हा परिषद केंद्रीय पूर्व माध्यमिक शाळा मोहगाव देवी येथील शाळेच्या बालकांच्या चिमुकल्या हाताने वनराई बंधारा तयार करण्यात आला. त्याचवेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पाच विद्यार्थ्यांची नावे कळविण्याचे निर्देश गटविकास अधिकारी कृष्णा मोरे यांना दिले होते. बालक दिनाचे औचित्य साधून मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी एक दिवस बालकांसोबत या उपक्रमाला सुरुवात केली. यात जिल्ह्यातील निवडक शाळेतील विद्यार्थ्यांचा समावेश होता.
महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयातील विद्यार्थिनी साक्षी पंचबुद्धे, प्राजक्ता ठवकर, आचल लेंडे, सोनाली चकोले, जान्हवी लांबट यांच्यासह शिक्षक गजानन वैद्य, शोभा कोचे तसेच जि.प. शाळा मोहगाव देवीचे विद्यार्थी छबीता भोयर, अपोशना डोंगरे, अर्पिता मुळे, अश्विना पडोळे, भाग्यश्री मडामे व शिक्षक किशोर कांबळे, माधवी नंदनवार यांनी सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या दालनात प्रवेश केला. सीईओंनी त्यांनी केलेल्या कार्याचे प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला. शैक्षणिक अडचणी, समस्या याबाबत संवाद साधला. विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या कामकाजाची ओळख व्हावी यासाठी अधिनस्त संपूर्ण विभागाचा कारभार बघता आला. अधिकाºयांच्या प्रत्यक्ष भेटी घेता आल्या. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजेश डोंगरे यांच्याशी भेट घालून दिली. त्यानंतर सीईओ यांनी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याशी भेट घालून दिली. जिल्हाधिकारी एका कार्यक्रमात व्यस्त असतानाही विद्यार्थ्यांसोबत काही वेळ घालवत शैक्षणिक विषयावर संवाद साधला.
या उपक्रमाने आपण नवीन जगात गेलोय, वेळेची महती, शिक्षण घेऊन मोठे होण्याचे बळ, प्रेरणा मिळाल्याची प्रतिक्रिया दहावीची विद्यार्थिनी साक्षी पंचबुद्धे, प्राजक्ता ठवकर, आचल लेंडे, जानवी लांबट, सोनाली चकोले यांनी व्यक्त केली. अविस्मरणीय क्षणाचा गाठोळा बांधून मुले शाळेत परतली तेव्हा त्यांच्या चेहºयावरचे तेज अनुभूती देत होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अधिकारी होण्याची पे्रेरणा व सामाजिक बांधिलकीची जाणीव होईल, अशी प्रतिक्रिया उपक्रमात सहभागी शिक्षक गजानन वैद्य, शोभा कोचे यांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केल्या.

Web Title: The district collector communicated with the students studied

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.