शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिर

By admin | Updated: June 3, 2016 00:38 IST

विविध नैसर्गिक आपत्तींना तोंड देता यावे याकरिता नवयुवकांना प्रशिक्षित करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनातर्फे राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन

भंडारा : विविध नैसर्गिक आपत्तींना तोंड देता यावे याकरिता नवयुवकांना प्रशिक्षित करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनातर्फे राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन व प्रशिक्षण शिबिर पावसाळा सुरु व्हायच्या अगोदर आयोजित करण्यात येते व यात प्रामुख्याने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील राष्ट्रीय सेवा योजनेतील निवडक स्वयंसेवकांचा समावेश करून घेण्यात येतो.या दहा दिवसीय प्रशिक्षण शिबिरात एनडीएफ तर्फे प्रशिक्षण दिल्या जाते. शारीरिक व मानसिकदृष्ट्या निरोगी असणाऱ्या वीस रासेयो स्वयंसेवक आणि दहा स्वयंसेविकांची प्रत्येक जिल्ह्यातून निवड करण्यात येते. शिबिरात आग, पूर, भूकंप, सर्पदंश, रस्ता अपघात व इतर अनेक प्रकारच्या आपत्तीमध्ये स्वत:चा व दुसऱ्यांचा जीव कसा वाचवावा याबद्दल प्रशिक्षण दिल्या जाते. यावर्षी हे शिबिर पुणे येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तर्फे दि. ५ ते १४ जून २०१६ दरम्यान आयोजित करण्यात आले आहे व यात सहभागी होण्याकरिता भंडारा जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील तीन हजार दोनशे पैकी तीस उत्कृष्ट स्वयंसेवकांची निवड करण्यात आली आहे. याकरिता भंडारा येथील स्थानिक जे.एम. पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विकास ढोमणे व भंडारा जिल्हा रासेयो समन्वयक डॉ.राजेंद्र शाह यांच्या मार्गदर्शनात विद्यापीठ नियमांनुसार निवड करण्यात आली.भंडारा जिल्ह्यातील १७ विविध महाविद्यालयातील रासेयो स्वयंसेवकांचा या चमूमध्ये समावेश आहे. सदर चमू सोबत यशवंतराव चव्हाण विज्ञान महाविद्यालय, लाखांदूर येथील रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.राकेश ठाकरे हे व्यवस्थापक म्हणून राहणार आहेत. पूर्वतयारी म्हणून निवडलेल्या चमूला मार्गदर्शन करण्यात आले. याकरिता बाजीराव कारंजेकर फार्मसी महाविद्यालय साकोलीचे प्रा.सातपुते, एन.पी. वाघाये महाविद्यालय लाखनीचे गणेश कापसे व प्रगती महिला महाविद्यालय भंडारा येथील प्रा.कृष्णा पासवान उपस्थित होते. रासेयोचे स्वयंसेवक जितसिंग लिल्हारे, हेमंत देवगडे, शुभांगी साकुरे यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)