शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा काळात कलचाचणी वाढविणार अडचणी

By admin | Updated: February 5, 2016 00:32 IST

दहावीच्या सराव परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी मापन विषयाचे पेपर शाळा अंतर्गत गुणांच्या तोंडी परीक्षा माहिती संप्रेषण तंत्रज्ञान परीक्षा आदी ...

वाढणार ताण : संगणक प्रणालीचा वापर, शाळांमध्ये उपक्रमाची चर्चाराजू बांते मोहाडीदहावीच्या सराव परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी मापन विषयाचे पेपर शाळा अंतर्गत गुणांच्या तोंडी परीक्षा माहिती संप्रेषण तंत्रज्ञान परीक्षा आदी धावपळीच्या महिन्यात कल चाचणी आयोजित करायची असल्याने विद्यार्थ्यांपेक्षा मुख्याध्यापकांना मानसिक ताणातून जावे लागणार आहे.शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांची करिअर विषयक अभिरुचीचे मोजमाप करण्याच्या हेतूने मानसशास्त्रीय कसोटी घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना कलचाचणी देणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा माध्यमिक २०१६ च्या परीक्षेस प्रथम प्रविष्ठ होणाऱ्या सर्व नियमित विद्यार्थ्यांची कलचाचणी आॅनलाईन पद्धतीने ८ फेब्रुवारी पासून ते २५ फेब्रुवारी या कालावधीत घेण्यात येणार आहे. या कलचाचणीचा शाळेच्या अभ्यासाशी किंवा नापास - पासशी काहीही संबंध नाही. मानसिक कल मोजणारी ही चाचणी विद्यार्थ्याने कोणतीही तयारी न करता अगदी सहज ही चाचणी द्यायची आहे. कलचाचणी भविष्य काळातील करिअर निवडीसाठी एक दिशादर्शक साधन आहे. पण, सदर चाचणी ही शाळा अंतर्गत आऊट आॅफटर्न परीक्षा, शाळा अंतर्गत होणाऱ्या महिला संप्रेषण तंत्रज्ञान परीक्षा श्रेणी मार्फत परीक्षा विज्ञान विषयाची प्रात्यक्षिक परीक्षा, इंग्रजी, मराठी, हिंदी, गणित या विषयाच्या तोंडी बहुपर्यायी परीक्षाचे नियोजन आदी कामे फेब्रुवारी महिन्यातच करायची असतात. तसेच बऱ्याच शाळांची सराव परीक्षाही फेब्रुवारी महिन्यात होत असते. शाळा अंतर्गत परीक्षेच्या धावपळीत कालावधीत कल चाचणी येवून धडकल्याने बऱ्याच शाळांच्या मुख्याध्यापकांना मानसिक ताण सहन करावे लागत आहे. तसेच मोहाडी तालुक्यात एकुण हायस्कुलच्या शाळा ३२ आहेत. या ३२ शाळांपैकी केवळ १४ एवढ्या शाळांमध्ये आयसीटीचे संगणक प्रयोगशाळा आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणेच्या सचिवांनी २ फेब्रुवारी रोजी कल चाचणीबाबत सूचना विभागीय मंडळाला निर्गमित केली आहे. त्यानुसार कलचाचणी करिताची संगणक प्रणाली विभागीय मंडळामार्फत शाळांना वितरित केली जाणार आहे. सर्व नियमित विद्यार्थ्यांची कलचाचणी आॅनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहेत. कलचाचणी प्रत्येक दिवशी चार सत्रामध्ये आयोजित केली जाणार असल्याची माहिती शाळांना देण्यात आली आहे. तसेच ज्या ठिकाणी आॅनलाईन पद्धतीने कलचाचणी घेणे शक्य होणार नाही. त्या ठिकाणी आॅफलाईन पद्धतीने कलचाचणी घेण्यात येणार आहे.