बावनथडीचे पात्र झाले वाळवंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2020 05:00 IST2020-05-01T05:00:00+5:302020-05-01T05:00:35+5:30
मध्यप्रदेशात उगम पावलेली बावनथडी नदी महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील नागरिकांची तृष्णा व शेतकऱ्यांकरीता वरदान ठरली आहे. बावनथडी नदीवर दोन राज्यांनी मिळून सीतेकसा येथे धरण बांधले आहे. त्यामुळे बावनथडी नदीचे पात्र उन्हाळ्यात कोरडे पडत आहे. नाकाडोंगरी शिवारातून वाहणारी बावनथडी सध्या कोरडी पडली आहे. येथे नदीचे पात्र विस्तीर्ण आहे. संपूर्ण बावनथडी नदी पात्राचे रुपांतर वाळवंटात झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

बावनथडीचे पात्र झाले वाळवंट
मोहन भोयर।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तुमसर तालुक्याची जीवनदायीनी बावनथडी नदी एप्रिल महिन्यात कोरडी पडली आहे. विस्तीर्ण नदी पात्रामुळे एखाद्या वाळवंटासारखी दिसत आहे. नदीपात्रात झुडुपी वनस्पती, कुठे माती तर तुरळक रेतीचा साठा आहे. नदीकाठावरील सुमारे ४० ते ४२ गावात उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. भूगर्भातील पाणी पातळीही येथे खोलवर गेली आहे.
मध्यप्रदेशात उगम पावलेली बावनथडी नदी महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील नागरिकांची तृष्णा व शेतकऱ्यांकरीता वरदान ठरली आहे. बावनथडी नदीवर दोन राज्यांनी मिळून सीतेकसा येथे धरण बांधले आहे. त्यामुळे बावनथडी नदीचे पात्र उन्हाळ्यात कोरडे पडत आहे. नाकाडोंगरी शिवारातून वाहणारी बावनथडी सध्या कोरडी पडली आहे. येथे नदीचे पात्र विस्तीर्ण आहे. संपूर्ण बावनथडी नदी पात्राचे रुपांतर वाळवंटात झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे. अनेक गावांच्या नळयोजना शेवटची घटका मोजत आहेत. मागील पाच ते सहा वर्षापासून नदी पात्र येथे कोरडे पडत आहे. धरण बांधकाम हे महत्वपूर्ण व शास्त्रीय कारण प्रमुख असले तरी बेसुमार रेती उपसा त्याला दुसरे कारण येथे आहे.
पदी पत्रात पाणी रोखून ठेवण्याकरिता रेतीची मोठी गरज असते. मात्र येथील नदीपात्रात रेतीच आता दिसत नाही.
पाणी टंचाई निर्माण होणार
बावनथडी नदी काठावरील सुमारे ४५ ते ५० गावात यंदा तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता अधिक आहे. त्याकरिता बावनथडी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याची गरज भासरणार आहे. मागील तीन ते चार वर्षापासून बावनथडी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.