शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: "मोदी तृणमूल काँग्रेसला मत द्या म्हणाले, तरी ममता बॅनर्जी विरोध करतील", अमित शाहांचा निशाणा
3
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
4
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
5
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
6
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
7
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
8
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
9
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
10
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
11
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
12
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
13
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
14
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
15
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
16
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
17
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
18
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
19
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
20
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
Daily Top 2Weekly Top 5

स्वस्त धान्यापासून जनता वंचित

By admin | Updated: November 3, 2014 23:21 IST

गरीब कुटुंबांना अल्प दरात अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून विविध योजनेअंतर्गत स्वच्छ धान्य दुकानातून धान्याचा वाटप केला जातो. मात्र स्वस्त धान्य दुकानदाराच्या

पालोरा (चौ.) : गरीब कुटुंबांना अल्प दरात अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून विविध योजनेअंतर्गत स्वच्छ धान्य दुकानातून धान्याचा वाटप केला जातो. मात्र स्वस्त धान्य दुकानदाराच्या मनमर्जी कारभाराने गरीब जनतेला धान्यापासून वंचित राहावे लागते. अंत्योदय कार्ड धारकांना २ रु. किलो १० कि. गहू तर ३ रु. प्रमाणे २५ किलो तांदळाचे वाटप करायला पाहिजे. मात्र ३० किलो धान्याचा वाटप केल्या जात आहे. यातही मोजताना घट करून दिल्या जात आहे. अनेक दुकानातून उचललेल्या धान्याची पावती दिल्य ाजात नाही. दुकान सुरु बंद करण्याचे वेळापत्रक नाही. महिन्याच्या शेवटीला दोन दिवस वाटप करून अन्नधान्य संपले म्हणून घोषित केल्या जाते. अनेकांचे शिधापत्रिका गहाळ झाल्या आहेत. तर अनेकांच्या शिधापत्रिका जीर्ण झाल्या आहेत. त्यांना धान्य दिल्या जात नाही. मात्र धान्याची उचल केली जात आहे. भर दिवसा गाड्या बोलावून धान्य भरून विक्रीकरिता काळ्या बाजारात विक्रीकरिता नेले जाते.प्रत्येक गावात स्वस्त धान्य दुकानावर वचक ठेवण्यासाठी दक्षता समितीची निवड करण्यात आली आहे. मात्र गावात कुणीही याकडे लक्ष देत नाही. या समित्या फक्त कागदोपत्री उरल्या आहेत.मागील दोन वर्षात पालोरा परिसरात अनेक स्वस्त धान्य दुकानदाराच्या घरी धाडी पाडल्या होत्या. मात्र कारवाई शून्य होत असल्यामुळे कुणीही पुढाकार ठेण्यास तयार होत नाही. गरीब, गरजू, भूमिहीन कुटुंबांना जीवन जगण्यासाठी स्वस्त धान्याचा आधार दिला जातो. मात्र पुरवठा विभागाच्या दुर्लक्षाने गरीब जनतेला धान्यपासून वंचित राहावे लागते. रॉकेलचीही हिच स्थिती आहे. अंत्यसंस्कारालाही रॉकेल मिळत नाही. पुरवठा विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. (वार्ताहर)