शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
2
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
3
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
5
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
6
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
7
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
8
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
9
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
10
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
11
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
12
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
13
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
14
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
15
“देशातील तरुणांचा मला अभिमान, माझ्या विधानाचा विपर्यास केला”; CJI सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण
16
NEET Exam Paper Leak: 'नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील प्राध्यापक मनीषा मांढरे अटकेत; सीबीआयकडून कारवाई
17
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
18
IPL फायनल दरम्यान PCB अध्यक्ष मोहसिन नक्वी भारतात येणार? जाणून घ्या ही चर्चा रंगण्यामागचं कारण
19
"तो युद्धविराम म्हणजे पाकिस्तानवर उपकार!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' विधानाने जागतिक राजकारणात खळबळ
20
भयंकर! निळ्यानंतर आता 'हिरव्या ड्रम'ची दहशत; पतीसोबत मिळून पत्नीने केली प्रियकराची हत्या
Daily Top 2Weekly Top 5

देव्हाडी उड्डाणपुलाची दिल्लीच्या पथकाकडून होणार चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 06:00 IST

पूल दोनही बाजूला दगडी आहे. दगडातून मोठ्या प्रमाणात राख वाहून गेली. सदर फ्लाय अ‍ॅश तिरोडा येथील वीज निर्मिती कारखान्यातील आहे. एका बाजुच्या अ‍ॅप्रोज पुलावर मोठे खड्डे व तळे गेले आहे. पुलात पोकळी निर्माण झाली होती. थातूरमातूर पोकळी भरण्यात आली. परंतु पुलाच्या अगदी खालच्या भागात पोकळी राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ठळक मुद्देपुलाला गेले तडे : राख वाहून जाण्याच्या कारणांचा शोध घेणार

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : देव्हाडी उड्डाणपुलावरून पावसाळ्यात राख वाहून गेल्यानंतर पुलाला मोठे तडे गेले आहेत. वाहतूक सुरू झाल्यानंतर अपघाताची शक्यता बळावली आहे. बांधकाम विभागाने तांत्रिक दुरूस्तीसाठी केंद्रीय रस्ते संशोधन पथकाला चौकशी व पाहणीसाठी पाचारण केले आहे. आता दिल्ली येथील तज्ज्ञांचे पथक या उड्डाणपुलाची पाहणी करून राख वाहून जाणाऱ्या कारणांचा शोध घेणार आहे.
तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील देव्हाडी येथे रेल्वे क्रॉसिंगवर उड्डापुलाचे बांधकाम सुरू आहे. गत पाच वर्षांपासून कासवगतीने काम सुरू आहे. काम केव्हा पूर्ण होईल याची अद्यापही कुणी खात्री देत नाही. विशेष म्हणजे रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकार संयुक्तरित्या हा उड्डाणपूल बांधत आहे. गत तीन वर्षांपासून उड्डाणपूल भरावात फ्लाय अ‍ॅशचा उपयोग केला जात आहे. पूल दोनही बाजूला दगडी आहे. दगडातून मोठ्या प्रमाणात राख वाहून गेली. सदर फ्लाय अ‍ॅश तिरोडा येथील वीज निर्मिती कारखान्यातील आहे. एका बाजुच्या अ‍ॅप्रोज पुलावर मोठे खड्डे व तळे गेले आहे. पुलात पोकळी निर्माण झाली होती. थातूरमातूर पोकळी भरण्यात आली. परंतु पुलाच्या अगदी खालच्या भागात पोकळी राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
यापूर्वी दिल्ली येथील एका तज्ज्ञ समितीने महिनाभरापुर्वी या पुलाची पाहणी केली. परंतु नेमकी पुलात पोकळी कुठे आहे व ती तांत्रिकदृष्ट्या कशी दूर करावी, याबाबत मार्गदर्शन करण्यात असमर्थता दर्शविली. त्यामुळे आता पुन्हा बांधकाम विभागाने सीआरआय कॉन्सलिंग ऑफ सायंटिफिक इंडिस्ट्रीयल रिसर्च पथक व सेंट्रल रोड रिसर्च पथकांना बोलाविले आहे. सदर पथक मार्च महिन्यात देव्हाडी उड्डाणपुलाची पाहणी करणार आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या अहवालानंतर दुरूस्ती केली जाणार आहे.

कारवाईची शक्यता
देव्हाडी उड्डाणपुलाच्या कामात हयगय झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितावर कारवाई होण्याची शक्यता आहे. तत्ज्ञांच्या अहवालानंतर संबंधित कंत्राटदाराशी काही रक्कम राखून ठेवण्याची शक्यता आहे. सदर पूल २४ कोटींचा असून याचे काम मात्र आता येथे रखडले आहे.