शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

हरदोली येथे गावकऱ्यांच्या रुग्णसेवेसाठी वाहन केले समर्पित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 6:00 AM

गावातील आरोग्य उपकेंद्रात विविध समस्या आहेत. उपचारासाठी औषध नसतात. चोवीस तास सेवा देणारे सेवक नसतात. रुग्णालयात नेण्यासाठी वाहन मिळणे तर गावकऱ्यांच्या नशिबी नसते. आता तर कोरोनाने कठीण वेळ आणली आहे. अशा परीक्षेच्या समयी कोणी ना कोणी देवदूत म्हणून धावून येतोच. ‘जनसेवा हीच ईश्वर सेवा’ असं म्हटलं जाते. असेच गावातील दोन देवदूत ग्रामसेवक गोपाल बुरडे व दुसरे सरपंच सदाशिव ढेंगे आरोग्यसेवेसाठी पुढे आले आहेत.

ठळक मुद्देसंडे अँकर । सरपंच व ग्रामसेवकाचा पुढाकार, संचारबंदीच्या काळात मिळणार चोवीस तास सेवा

राजू बांते।लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी: गावागावात कोरोनाचीच चर्चा. भीतीयुक्त वातावरण आहे. अशा परिस्थितीत कोणीतरी देवदूत येतोच. असाच गावातील सेवक पुढे आलाय. त्याने स्वत:ची चार चाकी गाडी आरोग्य विभागाला रुग्णांच्या सेवेसाठी २४ तास समर्पित केले आहे .गावातील आरोग्य उपकेंद्रात विविध समस्या आहेत. उपचारासाठी औषध नसतात. चोवीस तास सेवा देणारे सेवक नसतात. रुग्णालयात नेण्यासाठी वाहन मिळणे तर गावकऱ्यांच्या नशिबी नसते. आता तर कोरोनाने कठीण वेळ आणली आहे. अशा परीक्षेच्या समयी कोणी ना कोणी देवदूत म्हणून धावून येतोच. ‘जनसेवा हीच ईश्वर सेवा’ असं म्हटलं जाते. असेच गावातील दोन देवदूत ग्रामसेवक गोपाल बुरडे व दुसरे सरपंच सदाशिव ढेंगे आरोग्यसेवेसाठी पुढे आले आहेत.ग्रामपंचायत हरदोली (झंझाड) येथील ग्रामसेवक गोपाल बुरडे यांनी आपली स्वत:ची चार चाकी गाडी रुग्णसेवेकरीता नि:शुल्क देण्याची इच्छा असल्याचे सरपंच यांना सांगितले. सध्या कोरोना विषाणू गावखेड्यातील लोकही कोरोना भितीने ग्रासले आहे. तसेच आरोग्याचा गंभीर प्रश्न उद्भवला तर आम्ही काय करणार ही समस्या गावकºयांना सतावत होत . त्यात लॉकडाउनची भर पडली आहे. घराबाहेर अवास्तव, निष्कारण पडता येत नाही. पण, अशा अडचणीच्या वेळेत आरोग्याचा प्रश्न उद्भवला तर...ही चिंता हरदोली येथील ग्रामसेवक गोपाल बुरडे यांना सतावली. त्यांनी आपल्या मनातील भाव सरपंच यांच्याशी चर्चा करून मग गटविकास अधिकारी मोहाडी यांच्याकडे लेखी प्रगट केले. गावातील आरोग्य उपकेंद्रात आरोग्याच्या सोयीची वाणवा आहे. वैद्यकिय सेवेसाठी वाहन मिळणे तर दूरच. अशा प्रतिकूल परिस्थितीत आपण गावाच्या सेवेसाठी कामी येवू शकतो. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक उपायासाठी व इतर गंभीर वेळी गाडी हरदोली आरोग्य उपकेंद्राच्या सेवेत दाखल करण्याची इच्छा २७ फेब्रुवारी रोजी गटविकास अधिकारी यांचे नावे पत्र लिहून व्यक्त केली. लगेच त्याच दिवशी गटविकास अधिकारी मोहाडी यांनी संमती पत्र दिले. आताही एम .एच ३१ सी .पी .५४२९ गाडी वैद्यकीय अधिकारी डॉ. हिमांशु मते यांच्याकडे गाडीची चाबी व इंधनासाठी रक्कम सुपूर्त केली आहे. शनिवारपासून हरदोली आरोग्य उपकेंद्रात रुग्णाच्या सेवेसाठी गाडी दाखल झाली आहे. ही गाडी हरदोली आरोग्य उपकेंद्राच्या नियंत्रणात राहणार आहे. हरदोली गावाशिवाय ग्रामसेवक गोपाल बुरडे यांचेकडे सितेपार, पांढराबोडी ग्रामपंचायतीचा कारभार आहे. याही गावांसाठी ही गाडी रुग्णसेवेसाठी उपलब्ध राहणार आहे. या गाडीच्या इंधनाचा खर्च सरपंच सदाशिव ढेंगे करणार आहेत. ही गाडी १४ एप्रिलपर्यंत रुग्णसेवा देणार आहे.सेवाभावी सरपंचसरपंच सदाशिव ढेंगे यांनी अनेकवेळा सेवाभावाचा परिचय दिला आहे . लॉकडाउनच्या पहिल्याच दिवशी एक महिलेला प्रसूतीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला .त्या महिलेच्या वडिलांनी नागपूरला चलायची विनंती केली .लगेच ते तयार झाले. तिला नागपूर मेडिकलमध्ये दाखल केले. गावाकडे परत येताना पोलिसांनी पारडी नाक्यावर अडविले. कारण नसताना पोलिसांनी त्याच्या हातावर वीलगीकरणाचा शिक्का मारला.गर्दी टाळण्याचा उपायगावात बाहेरील व्यक्ती आली आहेत. त्यांचा प्रभाव इतरांवर झाला नाही पाहिजे. सिमेंट खुर्च्या, सार्वजनिक तयार करण्यात आलेल्या ओट्यावर अनेकांची बैठक असते. शिक्षण व कामासाठी बाहेर गेलेले व्यक्ती गावात आली आहेत. त्यांचा प्रभाव इतरांवर पडला नाही पाहिजे. त्यावर उपाययोजना म्हणून व गावातील चौकात गर्दी नियंत्रित करण्यासाठी सरपंच सदाशिव ढेंगे यांच्या आदेशाने काळा जळालेला आॅइल सिमेंट खुर्च्या, सार्वजनिक तयार करण्यात आलेल्या ओट्यावर पसरवीण्यात आला. आता चौकातील ओटे, खुर्च्या रिकाम्या राहत आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसsocial workerसमाजसेवक