शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

ठरले ! महाविकास आघाडीकडून अखेर तुमसरात चरण वाघमारे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 11:22 IST

राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून लढणार : आता लक्ष पुढील हालचालीकडे

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : तुमसर विधानसभा मतदार संघातून अखेर महाविकास आघाडीकडून उमेदवार म्हणून माजी आमदार चरण वाघमारे यांच्या नावाची घोषणा झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ते उमेदवार असतील. महाविकास आघाडीतील स्थानिक नेत्यांच्या प्रचंड विरोधानंतरही ही उमेदवारी जाहीर झाल्याने आता सर्वांचे लक्ष पुढील हालचालींकडे लागले आहे.

चरण वाघमारे यांनी गेल्या पंधरवाड्यात मुंबईत जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मध्ये प्रवेश घेतला होता. त्यांच्या या प्रवेशापासनच येथील महाआघाडीचे तिकीट त्यांना पक्के असल्याचे मानले जात होते. मात्र त्यांच्या उमेदवारीला स्थानिक स्तरातून प्रचंड विरोध सुरू झाला होता. या पार्श्वभूमीवर महाआघाडीतील स्थानिक नेत्यांनी मुंबईत जाऊन पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या भेटीही घेतल्या होत्या. मात्र या प्रयत्नांना यश आले नाही. अखेर राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्यांनी आपल्या निर्णयावर ठाम राहून ही उमेदवारी जाहीर केलीच. 

सुप्रिया सुळे नेत्यांची नाराजी दूर करणारतुमसर : विधानसभा मतदारसंघात माजी आमदार चरण वाघमारे यांना शरद पवार गटाच्या उमेदवारीला महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांचा विरोध असला तरी उमेदवारीचा अखेरपर्यंत फेरविचार झालाच नाही. दरम्यान खासदार सुप्रिया सुळे नाराज नेत्यांची भेट घेऊन नाराजी दूर करणार असल्याची माहिती आहे.

महायुतीकडून अजित पवार गटाने या मतदारसंघात विद्यमान आमदार राजू कारेमोरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. महाविकास आघाडीत मात्र राजकीय नाट्य बघावयास मिळत आहे. काँग्रेस व शरदचंद्र पवार गटातील स्थानिक नेत्यांचा चरण वाघमारे यांना विरोध कायम आहे. वाघमारे यांचा नामांकन अर्ज भरण्याकरिता खासदार सुप्रिया सुळे येणार असून त्या नेत्यांची नाराजी दूर करतील, अशी शक्यता आहे. वाघमारे यांच्याकडून नामांकन दाखल करण्याची तारीख ठरायची आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४NCPराष्ट्रवादी काँग्रेसtumsar-acतुमसरbhandara-acभंडारा