तुमसर : तालुक्यातील रोघा गावात अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून पाण्याच्या डबक्यात बुडून दोन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृत मुलांची नावे चंद्रकांत रूपचंद कुंभरे (वय ७) आणि समर्थ संजय उईके (वय ६) अशी असून, दोघेही ३१ मार्च रोजी सायंकाळपासून बेपत्ता होते. मुलांचा शोध घेण्यासाठी गावकऱ्यांनी आणि नातेवाईकांनी रात्रभर शोधमोहीम राबवली.
दरम्यान, १ एप्रिल रोजी सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास गावाजवळील पाण्याच्या डबक्यात दोन्ही मुलांचे मृतदेह तरंगताना आढळून आले. ही माहिती समोर येताच गावात शोककळा पसरली.
या दुर्दैवी घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत असून, लहान मुलांच्या सुरक्षेबाबत अधिक काळजी घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
Web Summary : Two boys, Chandrakant Kumbhare (7) and Samarth Uike (6), tragically drowned in a pond in Rogha village. They were missing since March 31st. A search party found their bodies on April 1st. The incident has cast a pall of gloom over the village.
Web Summary : तुमसर के रोघा गाँव में चंद्रकांत कुंभरे (7) और समर्थ उइके (6) नामक दो बच्चे तालाब में डूब गए। वे 31 मार्च से लापता थे। 1 अप्रैल को उनके शव मिले। गाँव में शोक की लहर है।