गावालगतच्या बंधाऱ्यात पोहायला गेलेल्या बालकाचा मृत्यू; भंडारा जिल्ह्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 17:34 IST2020-10-06T17:33:06+5:302020-10-06T17:34:17+5:30
Bhandara News, death भंडारा जिल्ह्यातील हरदोली गावालगतच्या बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेलेल्या एका बालकाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना लाखांदूर तालुक्याच्या हरदोली येथे मंगळवारी सकाळी घडली.

गावालगतच्या बंधाऱ्यात पोहायला गेलेल्या बालकाचा मृत्यू; भंडारा जिल्ह्यातील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : गावालगतच्या बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेलेल्या एका बालकाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना लाखांदूर तालुक्याच्या हरदोली येथे मंगळवारी सकाळी घडली.
खेतन प्रभू फुंडे (८) रा. हरदोली ता. लाखांदूर असे मृताचे नाव आहे. गावातील चार-पाच मुले नाल्यावर असलेल्या बंधाऱ्यावर पोहण्यासाठी मंगळवारी सकाळी गेली होती. बंधाऱ्यावरून खोल पाण्यात उडी मारून पोहणे सुरू होते. अशातच खेतन सुमारे पाच फूट खोल खड्ड्यात तळाला गेला. तो वर न आल्याने सहकारी मुले घाबरली. त्यांनी गावाकडे एकच धूम ठोकत गावात खेतन बुडाल्याची माहिती दिली. अख्खे गाव खेतनला वाचविण्यासाठी धावले. पाण्यातून त्याला बाहेर काढण्यात आले. प्राथमिक उपाययोजना घटनास्थळावर करण्यात आली. त्याला खाजगी दवाखान्यात दाखविण्यात नेण्यात आले. मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हरदोली येथील दुसºया वर्गात तो शिकत होता. आई-वडिलांना एकुलता एक खेतनचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.