कारवाईच्या धसक्याने दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2016 00:25 IST2016-09-06T00:25:16+5:302016-09-06T00:25:16+5:30

खापा येथील गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर खापा येथे आंदोलन झाले. आंदोलकावर पोलिसांनी गुन्हे दाखल करून अटकसत्र सुरू केले.

The death of both of the actress killed | कारवाईच्या धसक्याने दोघांचा मृत्यू

कारवाईच्या धसक्याने दोघांचा मृत्यू

प्रकरण खापा येथील महिलेच्या मृत्युचे : पोलिस महानिरीक्षकांना निवेदन, डॉक्टरवर गुन्हा दाखल
तुमसर : खापा येथील गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर खापा येथे आंदोलन झाले. आंदोलकावर पोलिसांनी गुन्हे दाखल करून अटकसत्र सुरू केले. ११ जणांनी न्यायालयातील कोठडीत रवानगी करण्यात आली. याचा तिघांनी धसका घेतला. त्यापैकी दोघे मृत्युमुखी पडले तर एका गणाचे मानसिक संतुलन बिघडले आहे. खापा येथील युवक समुहाने राहत असल्याची माहिती आहे.
यादरम्यान याप्रकरणात डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या मारहाण, लाठीमार व पोलिसांची दडपशाहीचा धसका रूखमा काशीराम गभने तथा नत्थू भोयर यांनी घेतल्याने त्यांचा मृत्यू झाला तर रघुनाथ राखडे यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. कुणाचा नातू मुलगा तुरूंगात बंद आहे. काही युवकांनी गावातून पलायन केले आहे. त्यांच्या आई-वडिलांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
खापा येथील नागरिकांनी विशेष पोलीस महानिरीक्षकांना पाठविलेल्या निवेदनातून नमूद केले आहे की, जयश्री राजेश बनकर या गर्भवती महिलेचा २९ आॅगस्ट रोजी शासकीय उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला होता. मृत्यूप्रकरणी संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी याकरिता मागण्याकरिता खापा चौकात शेकडो ग्रामस्थ शांततेने बसलेले होते. ग्रामस्थांवर पोलिसांनी लाठीमार केला व अश्रुधूराचा वापर केला. त्यानंतर प्रकरण शांत झाले. ३० आॅगस्टच्या रात्रीपासून पोलिसांनी अटकसत्र सुरू केले. आंदोलक ३० ते ३५ महिला व पुरूषांना पोलिसांनी मारहाण केली. पोलिसांच्या दहशतीपोटी कुणीही दवाखान्यात गेले नाही. गावातील युवक बाहेरगावी गेले. निरपराध महिलांवर पोलिसांनी लाठीमार केला. शांततामय मार्गाने निषेध नोंदविणाऱ्यावर लाठीमार प्रकरणाची चौकशीची ग्रामस्थांची मागणी आहे.(तालुका/शहर प्रतिनिधी)

Web Title: The death of both of the actress killed