शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

वाघ दर्शनाने वाघिणीच्या दोन शावकांना धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 05:00 IST

चिखला गाव परिसरात घनदाट जंगल आहे. या जंगलातील तलावात बुधवारी सायंकाळी नर वाघ पाण्याच्या शोधात आला होता. पाणी प्राशन केल्यानंतर हा वाघ जंगलाच्या दिशेने निघाला. या प्रसंगाचे काही युवकांनी चित्रीकरण केले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली. वन विभाग यामुळे अलर्ट झाला. आठ दिवसांपूर्वी चिखला येथील जंगल परिसरात एक वाघीण व तिची दोन शावके येथे दिसली होती. याची दखल वन विभागाने घेतली होती.

ठळक मुद्देवन विभाग अलर्ट : चिखला परिसरात संचार

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रातील चिखला गावाजवळ जंगलव्याप्त परिसरात एका तलावात बुधवारी सायंकाळच्या सुमारास एक नर वाघ दिसला. काही हौशी युवकांनी वाघाचा व्हिडिओ तयार केला.  हा सुखद क्षण आहे; परंतु आठ दिवसांपूर्वी वाघीण व तिच्या दोन शावकांचा याच परिसरात संचार असल्याचे पुढे आले होते.  आता शावक या नर वाघाचे नसतील तर त्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. वाघाच्या दर्शनाची दखल वन विभागाने  घेतली असून वाघीण व तिच्या दोन शावकांवर वन विभाग पाळत ठेवून आहे.चिखला गाव परिसरात घनदाट जंगल आहे. या जंगलातील तलावात बुधवारी सायंकाळी नर वाघ पाण्याच्या शोधात आला होता. पाणी प्राशन केल्यानंतर हा वाघ जंगलाच्या दिशेने निघाला. या प्रसंगाचे काही युवकांनी चित्रीकरण केले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली. वन विभाग यामुळे अलर्ट झाला. आठ दिवसांपूर्वी चिखला येथील जंगल परिसरात एक वाघीण व तिची दोन शावके येथे दिसली होती. याची दखल वन विभागाने घेतली होती. आता त्याच परिसरात एक नर वाघ दिसल्याने वन विभाग खडबडून जागा झाला आहे.जंगलात वाघ  तसेच अन्य वन्यप्राण्यांचे दर्शन झाल्याने हे जंगल समृद्ध मानले जाते. या जंगलाच्या सीमेनंतर मध्यप्रदेशची सीमा सुरू होते. त्यामुळे वन्यप्राणी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्याची शक्यता अधिक आहे. पाण्याच्या शोधात वन्यप्राणी अनेक किलोमीटरपर्यंत प्रवास करतात नर वाघ दिसल्याने तो बाहेरून आला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. वनविभाग त्यावर पाळत ठेवून आहे.

वाघांच्या लाेकेशनचा शोध  चिखला जंगलामधील दिसलेला नर वाघ व वाघीण तसेच तिच्या दोन शावकांचे वास्तव्य या परिसरात आहे. वैज्ञानिकदृष्ट्या नर वाघाचे हे शावक नसले तर त्या दोन शावकांना या वाघापासून मोठा धोका आहे. वाघाच्या दर्शनामुळे नाकाडोंगरी वन विभाग अलर्ट झाला असून, वाघीण तिच्या  दोन शावकांच्या मागावर सध्या आहे. वाघाचे लोकेशन व  त्या  दोन शावकांचे सध्या लोकेशन कुठे आहे याचा शोध घेत आहे.

 

टॅग्स :Tigerवाघforest departmentवनविभाग