वन्यप्राण्यांच्या हैदोसाने पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 05:01 IST2019-11-26T05:00:00+5:302019-11-26T05:01:09+5:30

रब्बी हंगामातील तुर, मिरची, चणा आदी पिकांचे वन्यप्राण्यांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचे प्रकार सुरु आहे. यामुळे बोदरा येथील शेतकरी कमालीचे त्रस्त झाले आहेत. गावात वन्यप्राण्यांची नित्यनेम भटकंती सुरु असल्याची माहिती वनविभागाला असताना देखील कोणतीही पर्यायी व्यवस्था केली जात नाही असा ग्रामवासीयांचा आरोप आहे.

Damage to crops by wildlife hairdos | वन्यप्राण्यांच्या हैदोसाने पिकांचे नुकसान

वन्यप्राण्यांच्या हैदोसाने पिकांचे नुकसान

ठळक मुद्देपिटेझरीवासी त्रस्त : वनविभागाने दखल घेण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : जंगलव्याप्त परिसराला लागून असलेल्या पिटेझरी परिसरात वन्यप्राण्यांचा धुडगुस चालू आहे. गावात व शेतशिवारात वारंवार वन्यप्राण्यांची भटकंती सुरु असते.
रब्बी हंगामातील तुर, मिरची, चणा आदी पिकांचे वन्यप्राण्यांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचे प्रकार सुरु आहे. यामुळे बोदरा येथील शेतकरी कमालीचे त्रस्त झाले आहेत. गावात वन्यप्राण्यांची नित्यनेम भटकंती सुरु असल्याची माहिती वनविभागाला असताना देखील कोणतीही पर्यायी व्यवस्था केली जात नाही असा ग्रामवासीयांचा आरोप आहे.
पिटेझरी हे गाव जंगलव्याप्त परिसराला लागून आहे. शेतशिवारात उभे असलेले पीक वन्यप्राण्यांच्या झुंडाने क्षणात भुईसपाट होऊन जातात. कर्जाच्या बोज्यात वावरणारा शेतकरी आपले सर्वस्व पणाला लावून विविध पिकांची लागवड करतो. घरामध्ये येणाऱ्या धानाचे पीक जंगली डुकरांच्या कळपाने हाती लागत नाही. रब्बीमध्ये ग्रामवासीयांनी तुर, मिरची, चना, पोपट इत्यादी पिकांची लागवड केली आहे. लागवड होताच डुक्कर व हरिणांच्या हैदोसाने शेतातील उभी रोपे भुईसपाट झाली. गावात बिबट्याची दहशत आहे. अख्खे गावकरी वन्यप्राण्यांच्या हैदोसाने त्रस्त असून शेती करायची कशी हा प्रश्न गावकऱ्यांसमोर उभा झाला आहे. वनविभागाने वन्यप्राण्यांचा धुमाकूळ बंद करण्यासाठी ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी साकोली तालुक्यातील पिटेझरी येथील शेतकºयांनी केली आहे.

नुकसानभरपाईची मागणी
सध्या अनेक शेतकºयांचे धानाचे पुंजणे शेतशिवारात आहेत. या पुंजण्यांची रानडुकरांकडून मोठी नासधूस केली जात आहे. वनविभागाने शेतकºयांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी आहे.

Web Title: Damage to crops by wildlife hairdos