शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणवर ग्राहक धडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 05:00 IST

लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना सरासरी बिल पाठविण्यात आले. आता ग्राहकांना तीन महिन्याचे एकत्र बिल पाठविले जात आहे. अनेक ग्राहकांना आलेले बिल दुप्पट, तिप्पट आकाराचे आहे. सरासरी बिल भरल्यानंतरही एवढे मोठे बिल कसे, असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. विशेष म्हणजे लॉकडाऊनच्या काळात कंपनीने रिडिंगच घेतले नाही. परंतु आलेले बिल दुप्पट तिप्पट आकाराचे आहे. यामुळे ग्राहक संतप्त झालेत.

ठळक मुद्देवीज बिलांची होळी : अव्वाच्या सव्वा बिलांवरून संताप, अधीक्षक अभियंत्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वीज वितरण कंपनीने अव्वाच्या सव्वा बिल पाठविल्याने संतप्त झालेल्या ग्राहकांनी सोमवारी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक देवून वीज बिलांची होळी केली. महावितरण विरूद्ध रोष व्यक्त करीत घोषणाबाजी करण्यात आली. तसेच वीज वितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना निवेदन देवून वीज बिल माफ करण्याची मागणी करण्यात आली. विशेष म्हणजे या संदर्भात ‘लोकमत’ने सोमवारी ‘वीज बिलाने ग्राहकांचे डोळे पांढरे’, असे वृत्त प्रकाशित केले होते.लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना सरासरी बिल पाठविण्यात आले. आता ग्राहकांना तीन महिन्याचे एकत्र बिल पाठविले जात आहे. अनेक ग्राहकांना आलेले बिल दुप्पट, तिप्पट आकाराचे आहे. सरासरी बिल भरल्यानंतरही एवढे मोठे बिल कसे, असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. विशेष म्हणजे लॉकडाऊनच्या काळात कंपनीने रिडिंगच घेतले नाही. परंतु आलेले बिल दुप्पट तिप्पट आकाराचे आहे. यामुळे ग्राहक संतप्त झालेत.सोमवारी येथील राष्ट्रीय महामार्गावरील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर ग्राहकांनी धडक दिली. नितीन तुमाने यांच्या नेतृत्वात अनेक वीज ग्राहक धडकले. वीज वितरण कंपनीच्या कारभाराविरूद्ध रोष व्यक्त केला. लॉकडाऊनमुळे जनतेचे आर्थिक कंबरडे मोडले असून दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत आहे. अशा परिस्थितीत बिल पाहून पोट भरावे की वीज भरावे, असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. यावेळी सोबत आणलेल्या विज बिलांच्या झेरॉक्सची होळी करण्यात आली. नितीन तुमाने, अंकुश वंजारी, प्रमोद केसलकर, यशवंत सोनकुसरे, सुधीर सार्वे, पवन मस्के, उमेश मोहतुरे, पलाश गोन्नाडे, निखिल धकाते, अवि हेडाऊ, मोहीत रणदिवे यांच्यासह अनेक वीज ग्राहक उपस्थित होते. ग्राहकांच्या घोषणाबाजीने काही काळ तणाव निर्माण झाला होता.अव्वाच्या सव्वा पाठविलेले वीज बिल माफ करून जनतेला न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी ग्राहकांनी वीज वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंता राजेश नाईक दिलेल्या निवेदनातून करण्यात आली. वीज बिल माफ न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. 

टॅग्स :electricityवीज