शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

पीक करपले अन् कुंकू हरपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 05:00 IST

जिल्ह्यातील मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या संदर्भात माहिती घेतली असता ज्वलंत वास्तव समोर आले.  २००१ पासून ते फेब्रुवारी २०२१ पर्यंत ५७४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यापैकी ३२२ प्रकरणे अपात्र ठरली आहेत. २०१९ मध्ये १५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यापैकी सात प्रकरणे पात्र तर आठ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली. या सातही शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे. मात्र २०२० मध्ये दहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यापैकी चार प्रकरणे अपात्र असून या सहा प्रकरणे चौकशीकरिता आहेत.

ठळक मुद्दे३२२ प्रकरणे अपात्र : जिल्ह्यात १८ वर्षात ५७४ शेतकरी आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा :  जिल्ह्यात धान उत्पादक शेतकऱ्यांची मोठी संख्या आहे, मात्र गत दोन दशकांत सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे कंटाळून जिल्ह्यातील ५७४ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. यापैकी फक्त २४६ शेतकऱ्यांना निकषांमध्ये पात्र ठरवून त्यांना मदत देण्यात आली आहे. उल्लेखनीय म्हणजे २०२० या कोरोना संकट काळात दहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यापैकी अजूनपर्यंत एकाही कुटुंबाला मदत मिळालेली नाही. जिल्ह्यातील मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या संदर्भात माहिती घेतली असता ज्वलंत वास्तव समोर आले.  २००१ पासून ते फेब्रुवारी २०२१ पर्यंत ५७४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यापैकी ३२२ प्रकरणे अपात्र ठरली आहेत. २०१९ मध्ये १५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यापैकी सात प्रकरणे पात्र तर आठ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली. या सातही शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे. मात्र २०२० मध्ये दहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यापैकी चार प्रकरणे अपात्र असून या सहा प्रकरणे चौकशीकरिता आहेत. या सहापैकी अजूनही कुणालाच मदत मिळालेली नाही. घरातील कर्ता व्यक्ती अचानक निघून गेल्याने हलाखीच्या परिस्थितीत सदर कुटुंब वास्तव्यास आहेत. लाखांदूर तालुक्यातील विरली बु. येथे महिन्याभरातच बाप-लेकाचा मृत्यू झाला. आता घरात फक्त सुन आणि सासू  आहेत. नियतीचा हा काळा घाला असह्य वेदना देणारा ठरला. साकोली तालुक्यातील कुंभली येथे भेंडारकर कुटुंबियाची अवस्था बिकट आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब आज अत्यंत हालाखीच जीवन जगत आहेत. त्या आधाराची गरज आहे.

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबांची आपबिती

सव्वा महिना झाला, पती गेले. अजुनही मदत मिळाली नाही. मजुरीचे काम करून प्रपंच सुरू आहे. लहान मुलगा व आई-वडील असा परिवार आहे. नियतीने सर्वस्व हिरावले आता करावे काय. - काजल भेंडाराकर, कुंभली

पतीने आत्महत्या केल्यानंतर शासन व लाेकप्रतिनिधींकडून जी मदत मिळावयास हवी हती, ती मिळाली नाही. मोलमजुरी व शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित आहे.- कमला शेंडे, कोसरा,ता.पवनी

महिन्याभरात माझे धनी आणि पोटचा गोळा काळाने हिरावला.  सासू व मी दोघेच आहोत. काय करावे अन्‌ काय नाही, सुचत नाही. पाणावलेल्या डो्ळ्यांनी मदतीची अपेक्षा करूनही आता उपयोग काय? वेळीच मदत मिळाली असती तर आज माझे कुंकु शाबूत असते. आर्थिक टंचाइने होत्याचे नव्हते केले.-जिजाबाई चुटे, विरली, बु. (ता. लाखांदूर) 

 

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या