दुबार पेरणीचे संकट टळले
By Admin | Updated: July 16, 2014 23:56 IST2014-07-16T23:56:33+5:302014-07-16T23:56:33+5:30
या परिसरात मागील २४ तासापासून सतत पडत असलेल्या पावसामुळे शेतकरी व सर्वांनाच मोठा दिलासा मिळाला आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना पेरणीकरीता संधी मिळत

दुबार पेरणीचे संकट टळले
गोसे (बुज.) : या परिसरात मागील २४ तासापासून सतत पडत असलेल्या पावसामुळे शेतकरी व सर्वांनाच मोठा दिलासा मिळाला आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना पेरणीकरीता संधी मिळत नसल्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत.
या परिसरात मागील २४ तासापासून सतत पाऊस पडत आहे. जवळपास दिड महिन्यापासून पाऊस येत नसल्यामुळे या परिसरातील सर्व पेरण्या थांबल्या होत्या. शेतकरी संकटात सापडला होता. शेतकऱ्यांनी धान, सोयाबिन, तुरी आदींची पेरणी केली पण पाऊस येत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार, तिबार पेरणीची वेळ आली आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा पाऊस पडण्याच्या प्रतिक्षेत आकाशाकडे लागल्या होत्या.
या शेतकऱ्यांनी पतसंस्था, सावकार, बँक, बचतगट आदी वित्तीय संस्थाकडून शेतकरी कर्ज काढले होते. त्यामुळे अगोदरच कर्जात बुडालेल्या शेतकऱ्यांना पावसाने संकटात टाकले होते. शेवटी कालपासून पाऊस पडत असल्यामुळे साऱ्यांनाच मोठा दिलासा मिळाला आहे.
अगोदर पेरणी केलेले बियाणे नष्ट झाल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार तिबार पेरणी करावी लागत आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना पेरणीकरीता संधी मिळत नाही. आज दुपारनंतर पाऊस काही प्रमाणात उघडल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामाला सुरूवात केली आहे. (वार्ताहर)