Crime Neews : ती फक्त शिकत होती... ते तिला 'प्रेमात' खेचत होते ! पोक्सोअंतर्गत तीन अल्पवयीनांवर गुन्हे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 18:56 IST2025-09-16T18:54:21+5:302025-09-16T18:56:47+5:30
'तिने' केला होता आत्महत्येचा प्रयत्न : चौघेही होते वर्गमित्र; एका मुलीचाही प्रकरणात समावेश

Crime Neews : She was just learning... They were 'pulling her into love'! Case file against three minors under POCSO
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : येथील दोन अल्पवयीन मुलगे मैत्रिणीला आणि एका अल्पवयीन मुलीविरुद्ध प्रेमसंबंधात अडकविण्यास बळजबरीने प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
या घटनाक्रमात अवघ्या १७ वर्षे वयातील दोन मुलेगे आणि दोन मुलींचा समावेश आहे. ते चौघेही आधीपासूनच वर्गमित्र होते. पुढे त्यामधील दोघांची दहावीनंतर शाळा बदलली. मात्र बारावीत शिकवणी वर्ग एकच असल्याने त्यांचा संपर्क कायमच राहिला. अशातच, दोन मुलांपैकी एकाचे एका मुलीकडे आकर्षण वाढले. यातून तिचा पिच्छा पुरविणे, पाठलाग करणे, आर्जवे करणे सुरू झाले. अन्य तिघांनी त्याला यात सहकार्य सुरू केले. यामुळे ती मुलगी प्रचंड वैतागून गेली. या तणावापोटी आत्महत्येचे पाऊल उचलण्यापर्यंत प्रकरण आले. अखेर तणावग्रस्त मुलीकडून ही बाब आईवडिलांना कळली. तिला विश्वासात घेऊन पालकांनी रविवारी पवनी पोलिस स्टेशन गाठले.
पीडित मुलीने पोलिसांना सर्व प्रकरण सांगून तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून दोन मुले आणि एका मुलीविरुद्ध पोलिसांनी पोक्सोअंतर्गत गुन्हे नोंदविले. पोलिसांनी तिघांनाही अटक करण्यात आली असून भारतीय न्याय संहितेच्या कलम ७८, १२६(२), ३५१(२), सहकलम १२, १६ पोक्सो नुसार गुन्हा नोंदविला आहे. सोमवारी त्यांना जिल्हा सत्र न्यायालयापुढे हजर केले असता जामिनावर तिघांचीही सुटका करण्यात आली. पुढील तपास पोलिस निरीक्षक नीलेश ब्रह्मे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक यशोदा पाटील करीत आहेत.
'तिने' केला होता आत्महत्येचा प्रयत्न
तिन्ही मित्रांकडून सुरू असलेला मानसिक त्रास, प्रेम संबंधांसाठी पुरविला जात असलेला पिच्छा यामुळे पीडिता प्रचंड तणावात आली होती. यामुळे विष घेऊन आत्महत्या करण्यापर्यंतचे टोकाचे पाऊल उचलण्यापर्यंतचे पाऊल तिने उचलले होते. अखेर पालकांना तिची तणावग्रस्त अवस्था लक्षात आली. चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार पुढे आला.