शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

२० टेबलवर होणार मतमोजणी

By admin | Updated: October 18, 2014 22:58 IST

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी उद्या रविवारला सकाळी ८ वाजतापासून सुरु होणार आहे. यासाठी २०० कर्मचाऱ्यांची मतमोजणी पर्यवेक्षक व मतमोजणी सहायक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

भंडारा : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी उद्या रविवारला सकाळी ८ वाजतापासून सुरु होणार आहे. यासाठी २०० कर्मचाऱ्यांची मतमोजणी पर्यवेक्षक व मतमोजणी सहायक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणी बंदोबस्तासाठी ५२४ पोलीस अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत.जिल्ह्यात तुमसर, भंडारा आणि साकोली या तीन विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी अनुक्रमे आयटीआय तुमसर, पोलीस बहुउद्देशिय सभागृह भंडारा आणि शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय सेंदूरवाफा साकोली येथे होणार आहे. त्याकरिता तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीकरिता २० टेबल निश्चित करण्यात आले आहे. तुमसर येथे १८ मतमोजणी फेऱ्या, भंडारा येथे २३ तर साकोली येथे २१ मतमोजणी फेऱ्या होतील. तिनही विधानसभा मतदार संघाच्या मतमोजणीकरिता प्रत्येक टेबलवर केंद्र शासनाचे सुक्ष्म निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहे.मतमोजणी बंदोबस्तासाठी तुमसर विधानसभा क्षेत्रासाठी १ पोलीस उपअधीक्षक, ३ पोलीस निरीक्षक, १० पोलीस उपनिरीक्षक, १०० पोलीस व इतर १५ इतर कर्मचारी तसेच २ अर्धसैनिक दलाच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आले आहे. भंडारा विधानसभा क्षेत्रासाठी १ पोलीस उपअधीक्षक, ६ पोलीस निरीक्षक, १७ पोलीस उपनिरीक्षक, १३४ पोलीस कर्मचारी, ४२ इतर कर्मचारी तसेच अर्धसैनिक दलाच्या २ तुकड्या तैनात करण्यात आले आहे. साकोली विधानसभा क्षेत्रासाठी १ पोलीस उपअधीक्षक, ४ पोलीस निरीक्षक, १२ पोलीस उपनिरीक्षक, ११० पोलीस कर्मचारी, २० इतर कर्मचारी तसेच अर्धसैनिक दलाच्या २ तुकड्या तैनात करण्यात आले आहे. भंडारा येथे नियंत्रण कक्षामध्ये १ पोलीस उपअधीक्षक, ३ पोलीस निरीक्षक, ७ पोलीस उपनिरीक्षक, ४० कर्मचारी आणि १० इतर कर्मचारी ठेवण्यात आले. त्याचबरोबर राज्य राखीव पोलीस बल आणि केंद्रीय सुरक्षा दलाची प्रत्येक १ कंपनी सुरक्षेसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. (शहर प्रतिनिधी)