शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
5
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
6
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
7
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
8
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
9
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
10
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
11
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
12
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
13
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
14
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
15
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
16
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
17
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
18
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
19
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
20
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहक मंच होणार ‘फाईलमुक्त’

By admin | Updated: November 19, 2014 22:33 IST

ग्राहक चळवळ ही काळाची गरज आहे. शोषणमुक्त समाजाची उभारणी करण्यासाठी सर्वांची गरज आहे. चळवळीच्या व्याप्तीसाठी शाळा व महाविद्यालयातून उपक्रम राबविण्यात येणार आहे.

अपंगांच्या तक्रारींना प्राधान्य : पत्रपरिषदेत सूर्यकांत गवळी यांची माहितीभंडारा : ग्राहक चळवळ ही काळाची गरज आहे. शोषणमुक्त समाजाची उभारणी करण्यासाठी सर्वांची गरज आहे. चळवळीच्या व्याप्तीसाठी शाळा व महाविद्यालयातून उपक्रम राबविण्यात येणार आहे. आधुनिकतेसोबतच जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचचे कामकाज पारदर्शक व्हावे यासाठी इंटरनेटचा वापर करून ‘फाईलमुक्ती’साठी प्रयत्न असून ग्राहकांची तक्रार अथवा पत्रव्यवहार भविष्यात ई-मेलने करण्याचा प्रयत्न असून अपंगांच्या तक्रारींना प्राधान्य देणार असल्याची माहिती ग्राहक कल्याण समितीचे अध्यक्ष सूर्यकांत गवळी यांनी दिली.ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष सूर्यकांत गवळी हे राज्याच्या दौऱ्यावर आहेत. ते भंडारा येथे आले असता त्यांनी आज बुधवारला जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत बोलत होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बनसोड, पुरवठा निरीक्षक विजय सहारे हे उपस्थित होते. माहिती देताना गवळी यांनी, ग्राहक चळवळ ही कोणत्याही व्यक्ती, धर्म वा व्यापाऱ्यांविरूध्द नसुन व्यवस्था सुधारणारी चळवळ आहे. व्यापाऱ्यांनी उचीत व्यापार करावा. सविनिय कायदे पालन, सुसंवाद व समन्वयातुन सर्वांच्या कल्याणासाठी ग्राहकाभिमुख शासन उभारण्यासाठी कटीबद्ध आहे. शासन शक्ती, लोकप्रतिनिधींचे सहकार्य, शासन दंडशक्तीतुन शोषणमुक्त समाजाची उभारणी करणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील सर्व विविध खात्याच्या ठिकाणी, तालुकास्तरावर ग्राहक दिन साजरा करण्यासाठी शासनस्तरावरून हालचाली करण्यात येणार आहे. ग्राहक चळवळ राबविण्यासाठी शाळा व महाविद्यालयातुन उपक्रम राबविण्यात येणार आहे. प्रभावी काम करणाऱ्या ला यशवंत ग्राहक राजा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून शासकीय, निमशासकीय कार्यालय, सिनेमागृह, रंगमंच येथे ग्राहक प्रतिज्ञा राबविण्याबाबत शासन दरबारी मागणी करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. (शहर प्रतिनिधी)