भंडारा : तुमसर-नागपूर मार्गावरील वर्दळीच्या खापा चौकात बुधवारी (१ एप्रिल) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला. अपघातग्रस्त वाहनात काँग्रेस पक्ष निरीक्षक संगीता बेनिवाल (राजस्थान), नागपूरच्या कुंदा राऊत, तसेच अन्य दोन पदाधिकारीही होते. अपघातानंतर खापा चौकात एकच खळबळ माजली होती.
काँग्रेस पक्षाच्या राजस्थान येथील पर्यवेक्षिका संगीता बेनिवाल या तुमसर येथील बैठक आटोपून कारने (एमएच ३१/ एफबी ९००१) नागपूरकडे रवाना झाल्या होत्या. त्याचवेळी गोंदियाच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव कारने (२५ बीएच ५४३६ आर) खापा चौकात त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. बेनिवाल यांनी तक्रार करण्याचे टाळून त्याच वाहनाने नागपूरकडे प्रयाण केले.
Web Summary : A car accident involving Congress party observers Sangeeta Beniwal and Kunda Raut occurred at Khapa Chowk on the Tumser-Nagpur road. While vehicles sustained significant damage, fortunately, no one was seriously injured. Beniwal continued to Nagpur after the incident.
Web Summary : तुमसर-नागपुर मार्ग पर खापा चौक पर कांग्रेस पर्यवेक्षकों संगीता बेनिवाल और कुंदा राउत की गाड़ी दुर्घटनाग्रस्त हो गई। वाहनों को नुकसान हुआ, लेकिन सौभाग्य से कोई गंभीर रूप से घायल नहीं हुआ। बेनिवाल घटना के बाद नागपुर के लिए रवाना हो गईं।