शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क पूर्णपणे माफ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 06:00 IST

राज्यात खासगी वैद्यकीय शिक्षण एमबीबीएस घेणारे गरीब कुटुंबातील व राखीव प्रवर्गातील असतात. राज्यात एकूण ११ महाविद्यालय असून प्रत्येक महाविद्यालयाचे शिक्षण शुल्क राज्यातील शिक्षण शुल्क समिती ठरवित असते. त्यानुसार प्रत्येक महाविद्यालयाच्या शुल्कात सहा लाखांपासून ते १२ लाखांपर्यंत वेगवेगळ्या प्रमाणात तफावत दिसून येते.

ठळक मुद्देभाजपची मागणी : आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्र्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्यातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या इतर मागास वर्ग, विशेष मागास प्रवर्ग व विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क पूर्णमाफ करण्यात यावे, तसेच खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्कावर पुर्नविचार करण्यात यावा, या मागणीचे निवेदन भाजपच्या वतीने खासदार सुनील मेंढे यांच्यामार्फत आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्र्यांना पाठविण्यात आले.राज्यात खासगी वैद्यकीय शिक्षण एमबीबीएस घेणारे गरीब कुटुंबातील व राखीव प्रवर्गातील असतात. राज्यात एकूण ११ महाविद्यालय असून प्रत्येक महाविद्यालयाचे शिक्षण शुल्क राज्यातील शिक्षण शुल्क समिती ठरवित असते. त्यानुसार प्रत्येक महाविद्यालयाच्या शुल्कात सहा लाखांपासून ते १२ लाखांपर्यंत वेगवेगळ्या प्रमाणात तफावत दिसून येते. वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्यासाठी सुमारे ३० ते ६० लाखापर्यंत शिक्षण शुल्क पूर्ण भरावे लागते. शासकीय तसेच खासगी वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नीट परीक्षा द्यावीच लागते. परीक्षेत मिळविलेल्या प्राविण्य क्रमानुसार किंवा रँकींगनुसार संविधानिक आरक्षीत तसेच खुल्या प्रवर्गातील जागेवर प्रवेश दिला जातो. प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी एससी. व एसटी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा विचारात न घेता सरसकट शिक्षण शुल्क माफ केले जाते. मात्र, इतर वर्ग, विशेष मागास प्रवर्ग व विमुक्त जाती, भटक्या जमाती या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे त्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांची मर्यादा विचारात घेऊन समाज कल्याण मंत्रालय विभागाकडून ५० टक्के शिक्षण शुल्क माफ केले जाते. तसेच वार्षिक उत्पन्न आठ लाखाचे वर असलेल्या पालकाच्या पाल्यांना शिक्षण शुल्कात सूट देण्यात येत नाही. त्यांना सहा ते १२ लाखांपर्यंत वेगवेगळी फी भरावी लागते. परंतु, वाढती महागाई हे निकष विचारात घेता त्यामुळे बऱ्याचशा होतकरू व हुशार विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क भरून प्रवेश घेणे परवडणारे नसते. त्यामुळे त्यांचे भविष्यात वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर व्हायचे दिव्यस्वप्न संपुष्टात येते. त्यामुळे शिक्षण शुल्कात पूर्णपणे सुट देण्यात यावी, तसेच खुल्या प्रवर्गातील प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्कात कपात करण्याबाबत पुनर्विचार करावा, अशी मागणी आहे. निवेदन देताना कैलास कुरंजेकर, डॉ. उल्हास फडके व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र