शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
2
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
3
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
4
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
5
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
6
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
7
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
8
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
9
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
10
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
11
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
12
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
13
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
14
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
15
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
16
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
17
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
18
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
19
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेचा फटका : इंधनाची होणार बचत

By admin | Updated: September 16, 2014 01:30 IST

१५ आॅक्टोंबरला होऊ घातलेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक

जि.प. पदाधिकाऱ्यांनी गाठले स्वत:च्या वाहनाने कार्यालयभंडारा : १५ आॅक्टोंबरला होऊ घातलेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्यात आचारसंहिता अंमलात आली आहे. ज्या दिवशी आचारसंहिता लागू झाली त्याच दिवशी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची शासकीय वाहने जिल्हा प्रशासनाने जमा केली. शनिवार, रविवारच्या सुटीनंतर हे पदाधिकारी आज सोमवारला जिल्हा परिषदेत पोहोचले ते स्वत:च्या वाहनानेच. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व ग्रामपंचायतींचा समावेश आहे. सरपंच वगळता अन्य पदाधिकाऱ्यांना शासनाकडून वाहन दिले जाते. विधानसभेची मुदत संपत आल्याने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने राज्यातील निवडणुकीची तारीख निश्चित केली आहे. आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये, यासाठी आयोगाच्या निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचे वाहन जमा करणे, प्रचार होईल, असे होर्डिंग्ज, बॅनर्स काढण्यात आले आहे. काही फलकांना झाकण्यात आलेले आहे.आदर्श आचारसंहिता निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांसाठी असली तरी, याचा पहिला फटका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना बसला आहे. भंडारा जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह चार विषय समितीचे सभापती, पंचायत समिती सभापती, नगराध्यक्ष यांचे वाहन जमा करण्यात आले आहे. भंडारा, तुमसर, पवनी नगराध्यक्षांना शासनाने वाहन दिले नसले तरी त्यांनाही आचारसंहितेचा फटका बसला आहे. जिल्ह्यातील भंडारा, तुमसर, साकोली, मोहाडी, पवनी, लाखनी व लाखांदूर या सात तालुक्यातील पंचायत समिती सभापतींनाही शासकीय वाहने नाहीत. दौरे किंवा शासकीय कामासाठी संवर्ग विकास अधिकाऱ्यांचे वाहन त्यांना वापरता येत होते. मात्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम संपेपर्यंत या पदाधिकाऱ्यांना शासकीय वाहनाचा वापर करता येणार नसल्यामुळे त्यांना स्वत:चे वाहन वापरावे लागणार आहे. दरम्यान, शासकीय वाहनांवर इंधनासाठी होणाऱ्या खर्चाची बचत होणार आहे. (शहर प्रतिनिधी)