कमांडो ग्रुप गोपीवाडाकडून स्वच्छता मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:24 IST2021-06-17T04:24:29+5:302021-06-17T04:24:29+5:30

एक पाऊल स्वच्छतेकडे शहापूर : कमांडो ग्रुप, गोपीवाडा शहापूरतर्फे स्वच्छता अभियान मोहिमेला २०२०पासून सुरुवात करण्यात आली आहे. यात संत ...

Cleaning operation from Commando Group Gopiwada | कमांडो ग्रुप गोपीवाडाकडून स्वच्छता मोहीम

कमांडो ग्रुप गोपीवाडाकडून स्वच्छता मोहीम

एक पाऊल स्वच्छतेकडे

शहापूर : कमांडो ग्रुप, गोपीवाडा शहापूरतर्फे स्वच्छता अभियान मोहिमेला २०२०पासून सुरुवात करण्यात आली आहे. यात संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान राबविण्यास कमांडो ग्रुप स्वत: व इतरानांही प्रेरणा देत आहेत. घनकचऱ्याचे व्यवस्थापन, वैयक्तिक स्वच्छता, परिसर स्वच्छता, यावर कसे नियोजन करता येईल, यावर चर्चा करण्यात आली. त्यावर उपाय काढण्यात आले. मुख्य मार्गदर्शक म्हणून चंद्रशेखर डोळस यांनी स्वच्छता मोहीम सुरू केली. ग्राम स्वच्छता मोहिमेद्वारे १५ जून रोजी जिल्हा परिषद शाळा, गोपीवाडा येथे स्वच्छता करण्यात आली. कमांडो ग्रुप, गोपीवाडा शहापूर विविध समाजसेवेचे काम करत असते. स्वच्छताप्रसंगी माजी सैनिक चंद्रशेखर डोळस, सामाजिक कार्यकर्ते आदेश कानतोडे, रितीक देवगडे, कुणाल कोरे, अंशुल झलके, भरत वडीचार, अनुप, विक्की, लक्की, श्रेया शेंडे, गायत्री शेंडे, गायत्री नागरे हे कमांडो ग्रुपचे सदस्य उपस्थित होते. जिल्हा परिषद शाळा, गोपीवाडातर्फे स्वच्छता मोहीम पार पडली.

Web Title: Cleaning operation from Commando Group Gopiwada