शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
2
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
3
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
4
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
5
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
6
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
7
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
8
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
9
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
10
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
11
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
12
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
13
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
14
"एआय जे काही सांगतेय, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका"; गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा इशारा
15
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
16
कसले अधिकारच नाहीत तर मंत्रिमंडळ बैठकीला जायचे कशाला? शिवसेनेचे मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंनाच विचारलेले...
17
अल-फलाहचे डॉक्टर ते 'जैश'चे ब्लास्ट इंजिनिअर! दिल्ली स्फोट प्रकरणातील 'डॉक्टर मॉड्यूल'चा पर्दाफाश
18
"प्रत्येकाने १६-१७ तास काम केलं...", दीपिकाच्या वादात आदित्य धरचं रणवीरसमोरच वक्तव्य
19
दिल्ली ब्लास्टमधील 'मॅडम सर्जन'ची 'अमीरी' तर बघा, कॅश खरेदी केली होती मारुतीची ही 'SUV'! 'मॅडम X' आणि 'मॅडम Z' कोण?
Daily Top 2Weekly Top 5

वङिलांच्या न्यायासाठी मुलांची सुरू आहे धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 00:37 IST

शेतजमिनीच्या भांडणाचे पर्यवसान मारहाणीत झाले. वृद्ध पित्याला कुटुंबातीलच व्यक्तीने मारले. मारहाणीची कैफियत पित्याने पोलीस ठाण्यात केली. पण पोलिसांनी वृद्ध पित्याला हाकलून लावले. मारहाणीविषयी तक्रार नोंदवून चौकशी करावी, या न्यायासाठी वृद्ध पित्याच्या मुलीनी पोलीस अधीक्षक भंडारा यांच्याकडे धाव घेतली.

ठळक मुद्देनिलज येथील घटना : पत्रपरिषदेत अन्यायाचा पाढा

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : शेतजमिनीच्या भांडणाचे पर्यवसान मारहाणीत झाले. वृद्ध पित्याला कुटुंबातीलच व्यक्तीने मारले. मारहाणीची कैफियत पित्याने पोलीस ठाण्यात केली. पण पोलिसांनी वृद्ध पित्याला हाकलून लावले. मारहाणीविषयी तक्रार नोंदवून चौकशी करावी, या न्यायासाठी वृद्ध पित्याच्या मुलीनी पोलीस अधीक्षक भंडारा यांच्याकडे धाव घेतली. सहनशिलतेचा अंत बघणारी घटना निलज बुज. येथे घडली. यासंबंधी शनिवारला विश्रामगृह मोहाडी येथे धनराज माटे, मुलगा संदीप व मुलगी संध्या यांनी पत्रपरिषद घेतली.सामान्य जनतेला पोलीस शत्रू का वाटतात त्याचा पुरावा म्हणजे निलज येथे घडलेली घटना. जमिनीच्या वादातून मनराज माटे, अनिल माटे, लक्ष्मीबाई माटे यांनी धनराज माटे यांना लोखंडी खिळे असलेल्या काठीने लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. एवढेच नाही तर याच शेतावरील जमिनीत गाडून टाकेन अशी धमकी धनराज माटे यांना देण्यात आली. फिर्यादी धनराज माटे पोलीस ठाणे करडी येथे गेले. तेथील पोलिसांनी साध्या कागदावर तक्रार लिहण्याची नाटक केली. तोंडी तक्रार लिहून झाल्यावर गुन्हा नोंदची प्रत मागण्यात आली. तथापि तक्रारीची प्रत फिर्यादी धनराज माटे यांना देण्यात आली नाही. खिळ्याच्या पाटीने मारहाण झाल्याने धनराज रक्तबंबाळ झाले होते. दुसऱ्या दिवशी पुन्हा फिर्यादी ठाण्यात गेले. तक्रार केल्याची प्रत मागितली. पण पोलिसांनी फिर्यादीला उलटच सुनावले. शेतीचा नेहमीचा वाद आहे. जागेसाठी कशाला भांडता. शेतजमीन देवून द्या असे धनराजला बाळकडू देण्यात आले. तुमचा जीव गेला तरी चालेल तक्रार घेतली जाणार नाही असा दमही करडी पोलिसांनी दिला. २ आॅगस्ट रोजीच्या घटनेसंबंधी फिर्यादीच्या मुलीने करडी पोलीस स्टेशन गाठले. परंतु पोलीस खात्यात मनराज माटे यांनी नोकरी केली. त्यांनी आपल्या ओळखीचा लाभ घेत फिर्याद नोंद करू दिली नाही असे जिल्हा पोलीस अधीक्षक भंडारा यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. दोन आठवड्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयाचे दरवाजे ठोठावले. मात्र न्याय मिळाला नाही. 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती