शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
4
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
7
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
8
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
9
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
10
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
11
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
12
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
13
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
14
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
15
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
16
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
17
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
18
मराठी भाषेसाठीचा कायदा काय सांगतो?; व्यवहारात वापर वाढवणे ही प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी
19
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
20
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
Daily Top 2Weekly Top 5

चिचाळ ग्रामपंचायतीचा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 05:00 IST

गावातील वाहणाऱ्या नालीच्या सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन होत नसल्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. घाणीने साचलेल्या व तुडुंब भरलेल्या नाल्यांची सफाई करण्याची आवश्यकता आहे. याकरिता ग्रामपंचायत प्रशासनाने ठोस पावले उचलून सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. तसेच घराशेजारी ठिकठिकाणी शेणखताचे ठिगारे असल्यामुळे परीसरात खूप दुर्गंधी पसरली आहे.

ठळक मुद्देगावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात : नागरिकांनी केली स्वच्छतेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कबारव्हा : लाखांदूर पंचायत समिती अंतर्गत येणाºया चिचाळ येथील ग्रामपंचायत प्रशासनाला स्वच्छतेचा विसर पडल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गावोगावी ग्रामस्वच्छता अभियान राबविले जात आहे. गावागावात जंतुनाशक फवारणी केली जात आहे. तसेच स्वच्छतेबाबत ग्रामपंचायतस्तरावरून जनजागृती करण्यात येत आहे. मात्र चिचाळ गावात अजूनही जंतुनाशक फवारणी करण्यात आली नाही.गावातील वाहणाऱ्या नालीच्या सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन होत नसल्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. घाणीने साचलेल्या व तुडुंब भरलेल्या नाल्यांची सफाई करण्याची आवश्यकता आहे. याकरिता ग्रामपंचायत प्रशासनाने ठोस पावले उचलून सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. तसेच घराशेजारी ठिकठिकाणी शेणखताचे ठिगारे असल्यामुळे परीसरात खूप दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.कोरोना विषाणूने सारे जग भयभयीत झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छतेबाबतीत जागृकता निर्माण झाली आहे.यासंदर्भात चिचाळ येथील नागरीक उत्तम नंदेश्वर यांनी स्थानिक प्रशासनाला लेखी निवेदन देऊन घराशेजारी असलेले शेणखताचे ढिगारे हटविण्याची मागणी केली मात्र याकडे स्थानिक प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.त्यांनी याप्रकरणी तंटामुक्त समिती चिचाळ, संबंधित आरोग्य अधिकारी बारव्हा व खंडविकास अधिकारी यांना सुद्धा लेखी निवेदन देण्यात आले पण अजून पर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. जिल्ह्याचे मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन चौकशी करून कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात सरपंच गिरीष झोडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला.नालीवर खातकुडेचिचाळ येथील नागरिक उत्तम नंदेश्वर यांच्या घराशेजारी परिसरातील काही नागरिकांनी सांडपाणी वाहून जाणाºया नालीवर शेणखताचे खातकुडे तयार केले आहेत. त्यामुळे नालीत वाहणारे सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून शेणखताच्या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या परिसरात डासांचा प्रादूर्भाव वाढल्यामुळे गावकऱ्यांत संसर्गजन्य आजाराची भीती निर्माण झाली आहे. अंगणवाडी सभोवताल काही नागरिक आपली जनावरे बांधत आहेत. जनावरांच्या मलमूत्रामुळे घाण निर्माण झाली आहे. अंगणवाडीत येणाऱ्या चिमुकल्यांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत