शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
6
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
7
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
8
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
9
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
10
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
11
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
12
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
13
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
14
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
15
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
16
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
17
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
18
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
19
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
20
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
Daily Top 2Weekly Top 5

रासायनिक खतांसाठी आता हेक्टरी १६०० रुपये अधिक मोजावे लागतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:35 IST

भंडारा जिल्ह्यात धानासह भाजीपाला, गहू, हरभरा आदी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. पिकांच्या वाढीसाठी संयुक्त खतांची मात्रा दिली जाते. ...

भंडारा जिल्ह्यात धानासह भाजीपाला, गहू, हरभरा आदी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. पिकांच्या वाढीसाठी संयुक्त खतांची मात्रा दिली जाते. मात्र आता रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाट वाढ झाली आहे. प्रत्येक खताच्या किमतीत सरासरी २०० ते २५० रुपये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. धानासाठी हेक्टरी ८ बॅग रासायनिक खताची गरज असते. आता दरवाढीने हेक्टरी १६०० रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. आर्थिक अडचणी असलेल्या शेतकऱ्यांना डिझेल दरवाढीसोबतच रासायनिक खतांच्या वाढीचाही मोठा फटका बसत आहे. यामुळे शेतकऱ्यांत संतापाची लाट निर्माण झाली आहे.

ट्रॅक्टरच्या मशागतीचा ८०० रुपये तास

इंधनाच्या दरवाढीचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. डिझेलचे दर दररोज वाढत असल्याने मशागतीच्या खर्चातही वाढ झाली आहे. पूर्वी ट्रॅक्टरचे मशागतीचे दर प्रति तास ६०० रुपये होते. परंतु आता ८०० रुपये प्रति तास झाले आहेत. एका एकराला नागरटीपासून ते चिखलणीपर्यंत साडेतीन तास ट्रॅक्टर हवा असतो. पूर्वी २१०० रुपये एकरी खर्च यायचा. परंतु तो आता २८०० पर्यंत पोहोचला आहे. शेतकरी आता परंपरागत पद्धतीने बैलाच्या साहाय्याने मशागत करावी काय, अशा विचारात दिसत आहे.

महागाईची हद्द झाली

डिझेलचे दर दररोज वाढत आहेत. शेतीशी निगडित बहुतांश कामे आता ट्रॅक्टर व इतर यांत्रिक साह्याने केली जात आहे. मात्र दरवाढ झाल्याने शेतकरी आता परंपरागत पद्धतीने मशागत करण्याच्या तयारीत दिसत आहेत.

खताच्या किमती वाढल्याने आमचे गणित बिघडणार आहे. आधीच लागवड खर्चही निघत नाही. निसर्गाचा प्रकोप आणि किडनीचा प्रादुर्भाव यामुळे धान उत्पादक अडचणीत आले आहेत. खताच्या किमती कमी करून दिलासा द्यावा.

ललीराम खंडाईत, दिघोरी (मोठी)

डिझेलचे दर वाढल्याने मशागत खर्चही वाढत आहे. शेतीचा दिवसेंदिवस खर्च वाढत असताना आता सर्वत्र महागाई दिसत आहे. परंतु शेतकऱ्यांच्या मालाला तीच किंमत मिळत आहे. यामुळे शेती हा घाट्याचा व्यवसाय झाला आहे.

माधवराव झोडे, मुर्झा

भंडारा जिल्ह्यात बहुतांश शेतकरी धानाची शेती करतात. धान पिकाला खताची मात्रा मोठ्या प्रमाणात लागते. परंतु आता २०० ते २५० रुपये दरवाढ झाल्याने आमचे बजेट कोलमडणार आहे. शासनाने खताचे दर तरी नियंत्रणात ठेवावे.

-नामदेव आंबेडारे, पारडी

खत आधीचे दर आताचे दर

१०:२६:२६ ११८५ १३८५

१५:१५:१५ १०४० १२००

१२:३२:१६ १२०० १३७५

२४:२४ १३०० १५००

२०:२०:००:१३ ९५० १२२५

डीएपी १२०० १४५०