शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

स्वस्तातल्या कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात आणले पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2022 05:00 IST

अख्ख्या महाराष्ट्रभर कांद्याने शेतकऱ्यांना रडवलेले आहे. महागाईच्या कचाट्यातून उत्पन्न शोधत बाजारपेठेत भाव नसल्याने शेतकरी देशोधडीला लागत आहे. कोणतेही उत्पन्न घ्या अपेक्षित उत्पन्नानंतर दर मात्र मिळत नाही. महागाई शिरजोर होत चालली आहे. मजुरी व मजूर टंचाई ही शेतकऱ्यांसमोरची मोठी अडचण वर्तमानात येत आहे.  उत्पन्न घसरत चालले आहे. करावे काय? असा प्रश्न शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर उभा आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : खरंच कांदा रस्त्यावर आलेला आहे. भाव नसल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी  तरळते आहे. काढणीचा खर्च सुद्धा निघेनासा झाला आहे. तीनशे रुपयाला चाळीस किलोचा कट्टा असा दर पालांदूर येथील आठवडी बाजारात शनिवारला अनुभवायला आला. अख्ख्या महाराष्ट्रभर कांद्याने शेतकऱ्यांना रडवलेले आहे. महागाईच्या कचाट्यातून उत्पन्न शोधत बाजारपेठेत भाव नसल्याने शेतकरी देशोधडीला लागत आहे. कोणतेही उत्पन्न घ्या अपेक्षित उत्पन्नानंतर दर मात्र मिळत नाही. महागाई शिरजोर होत चालली आहे. मजुरी व मजूर टंचाई ही शेतकऱ्यांसमोरची मोठी अडचण वर्तमानात येत आहे. उत्पन्न घसरत चालले आहे. करावे काय? असा प्रश्न शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर उभा आहे. पावसाळ्याच्या पूर्वी बऱ्याच घरात किमान पावसाळाभर  पुरेल एवढा कांदा खरेदी करून ठेवला जातो. त्यामुळे हमखास मागणी असते, परंतु संपूर्ण राज्यस्तरीय बाजारपेठेत कांद्याची अवस्था बिकट असल्याने त्याचा थेट परिणाम लहान बाजारपेठेलाही भोगावा लागत आहे. 

भंडारा जिल्ह्यात कांद्याचे सुमार उत्पादन- भंडारा जिल्ह्यातील पवनी, लाखांदूर तालुक्यात सर्वाधिक कांद्याचे उत्पादन घेतले जाते. स्थानिकचा कांदा असल्याने स्थानिक बाजारपेठेत मोठी मागणी दरवर्षी असते. ती मागणी लक्षात घेऊन शेतकरी मोठ्या आशेने याहीवर्षी कांदा लागवडीखाली आणला. बुरशीजन्य रोगासह अन्य रोगांचा मुकाबला करीत उत्पादन घेण्यात आले, मात्र जिल्ह्याच्या कोणत्या बाजारपेठेत कांद्याला दहा रुपयाच्यावर दर नसल्याने कांदा उत्पादक रडवेल्या अवस्थेत आहेत.आधारभूत केंद्रांतर्गत खरेदी करा!- खुल्या अर्थव्यवस्थेत शासनाच्या ध्येयधोरणाचा थेट फटका कृषी उत्पन्नाला बसत आहे. शेतकरी व्यक्तिगत विचार करून स्थानिक बाजारपेठेच्या आधाराने उत्पन्न घेतो, मात्र राज्यस्तरीय किंवा जागतिक पातळीवरील अर्थव्यवस्थेचा अभ्यास वेळेवर बदलत असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला अपेक्षित दर मिळत नाही. त्यामुळे घाम गाळूनही पदरी निराशाच पडत आहे. अशा कठीण वेळी शासनाने आधारभूत किमतीचा आधार दिल्यास हक्काचा शेतकरी उभा राहायला मदत शक्य आहे.

 

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरी