शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

सहकारी संस्थांच्या निवडणूक नियमात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2016 00:31 IST

सहकारी संस्थांच्या निवडणुकीत सभासद थकबाकीदार नसावा ही अट आतापर्यंत केवळ उमेदवार तसेच निवडून आल्यावर सदस्यत्व कायम ठेवण्यासाठी बंधनकारक होती.

मतदानास अपात्र : आता थकबाकीदार ठरणारशिवशंकर बावनकुळे साकोलीसहकारी संस्थांच्या निवडणुकीत सभासद थकबाकीदार नसावा ही अट आतापर्यंत केवळ उमेदवार तसेच निवडून आल्यावर सदस्यत्व कायम ठेवण्यासाठी बंधनकारक होती. आता त्यात बदल झाला असून थकबाकीदारांना यापुढे सहकारी संस्थांच्या निवडणुकीत मतदानही करता येणार नाही. सहकारी क्षेत्रातील बहुचर्चित ९७ व्या घटनादुरुस्तीनुसार हा बदल करण्यात आला असून आता थकबाकीदाराला या बदलाचा फटका बसण्याची चिन्हे आहेत.सहकार कायद्यानुसार यापूर्वी सहकारी थकबाकीदार व बिगर थकबाकीदार सभासदांना मतदानात भाग घेण्याचा अधिकार होता. संबंधित संस्थेची थकबाकी असणाऱ्या सभासदांना निवडणुकीत उमेदवारीसाठी अपात्र मानले जात होते. निवडून आल्यावर थकबाकीदार सभासदांचे संचालकपद रद्द केले होते. या परिस्थितीत इच्छूक व संचालकपद रद्द केले जात होते. या परिस्थितीत इच्छूक व संचालकांच्या कर्जाचे हप्ते नियमित फेडण्याकडे कल राहत असे. परंतु कुटुंबातील सदस्य किंवा सगोसोयरे असलेल्या सभासदांकडील थकबाकीसाठी आग्रही राहत नसत. अशा थकबाकीदारांचा मतदानाचा अधिकार कायम राहत असल्याने बऱ्याच संस्थाचालकांना साध्य होत असे. आता नव्याने लागू झालेल्या नियमांना मात्र थकबाकीदारांच्या मदतीने विशेषत: विविध कार्यकारी सेवा पतसंस्था, सहकारी संस्था ताब्यात ठेवण्याच्या प्रकारांना चाप बसणार आहे.९७ व्या घटनादुरुस्तीनुसार झालेल्या या बदलानुसार सहकारी संस्थेकडून कर्ज घेतलेल्या सभासद जर थकबाकीदार झाला तर त्यास कामकाजात भाग घेण्याचा आणि मतदानाचा हक्क असणार नाही.या तरतुदीनुसार यापूर्वी मुदतवाढ मिळालेल्या मुदत संपणाऱ्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याच्या दृष्टीने सहकार खात्यातर्फे मतदार याद्या अद्यावत करण्याचे काम सध्या सुरु झाले आहे. यादी करताना संबंधित संस्थांच्या माध्यमातूनच थकबाकीदारांना त्याचविषयी अवगत करणारी नोटीस धाडण्यात आली आहे. विहीत वेळेत थकबाकीचा भरणा न केल्यास थकबाकीदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात येणार नाहीत असा इशाराही या नोटीसाद्वारे देण्यात आला आहे.