शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्षपदी मोटघरे, उपाध्यक्षपदी ठवकर

By admin | Updated: July 26, 2014 01:23 IST

अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर पवनी नगर

पवनी नगरपालिका निवडणूक : राष्ट्रवादी काँग्रेसने खेळली खेळीपवनी : अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर पवनी नगर पालिकेत आज शुक्रवारला झालेल्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याने सेनेच्या रजनी मोटघरे या नगराध्यक्षपदी तर राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ.विजय ठवकर याची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. विशेष म्हणजे पवनी पालिकेत शिवसेनेची एकहाती सत्ता असताना उपाध्यक्ष राकाँचा निवडून आल्यामुळे शिवसेनेत खळबळ उडाली आहे.अडीच वर्षापुर्वी झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पवनी नगर परिषदेवर शिवसेनेने सत्ता मिळविली होती. अडीच वर्षाचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच शिवसेनेमध्ये दुफळी निर्माण झाली. शिवसेनेने १७ पैकी १३ जागा जिंकून एकहाती सत्ता काबीज केली होती. मात्र विकासकामात अडचणी येत असल्यामुळे नगरसेवकांमध्ये धुसपूस सुरू झाली. या नगरसेवकांची नाराजी शिवसेनेच्या नेत्यांना दूर करता आली नाही. त्यामुळे नाराज नगरसेवक मागील वर्षभरापासून महिलांचा सदस्यांचा दबावगट तयार करण्याचा प्रयत्न करीत होते. अडीच वर्षाकरीता नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिलांकरीता झाल्याचे घोषित होताच या गटबाजीने जोर धरला होता.रजनी मोटघरे यांना नगराध्यक्ष बनविण्याच्या मनस्थितीत पक्षश्रेष्ठी असल्यामुळे सेनेचा दुसरा गट नाराज होता. नाराजीला न जुमानता उपाध्यक्ष नरेश बावनकर यांना हाताशी घेऊन दुसऱ्या गटावर मात करण्याची योजना आखली. परंतु सेनेमधील दोन गट निवडणुकीत उतरले तरी त्यांना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना सोबत घेवून निवडणुकीला सामोरे जाणे गरजेचे होते. चालून आलेली ही संधी भंडारा जिल्हा दुग्ध संघाचे अध्यक्ष विलास काटेखाये यांनी हेरून दोन सदस्य असलेल्या राष्ट्रवादीने पालिकेवर विजय मिळविला.पवनी नगर परिषदेत १७ सदस्य असून यात १३ सेनेचे, २ काँग्रेसचे, २ काँग्रेस व २ राष्ट्रवादी असे पक्षीय बलाबल आहे. यात मोहन सुरकर गटाकडून नगराध्यक्ष पदाकरीता वनिता काटेखाये तर उपाध्यक्ष पदाकरीता काँग्रेसचे धमेंद्र नंदरधने यांनी तर नरेश बावनकर गटाकडून रजनी मोटघरे यांना नगराध्यक्ष तर डॉ.विजय ठवकर यांनी उपाध्यक्ष पदाकरिता आवेदन भरले होते. ही निवडणूक प्रक्रिया पालिकेच्या सभागृहात हात उंचावून पार पाडण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रविंद्र कुंभारे, सहायक निवडणुक अधिकारी म्हणून मुख्याधिकारी रविंद्र भेलावे यांनी काम पाहिले. (तालुका प्रतिनिधी)