शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

नेरी ग्रामपंचायतीला केंद्राचा पंचायत सशक्तीकरण पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 05:01 IST

सरपंच आनंद मलेवार आणि ग्रामसेविका निरंजना खंडाळकर यांच्या दूरदृष्टीने गावात वेगाने विकासकामे करण्यात आली. ग्रामपंचायत सदस्यांचा सक्रीय सहभाग आणि नागरिकांचा पुढाकारही यासाठी महत्वाचा ठरला. ग्रामपंचायतीने गावविकासाचा निर्धार घेतला. सरपंच आनंद मलेवार यांच्या मार्गदर्शनात तीन वर्षात गावाचा कायापालट करण्यात आला. नेरीची लोकसंख्या २२३५ आहे. गाव लहान असले तरी समस्या अनेक होत्या.

ठळक मुद्देमानाचा तुरा । ग्रामस्तरावर विकासकामांची दखल

लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : ग्रामस्तरावर विकासकामे आणि शासनाच्या धोरणांची अंमलबजावणी केल्याबद्दल मोहाडी तालुक्यातील नेरी ग्रामपंचायतीला केंद्रसरकारचा पंचायत सशक्तीकरण पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराने ग्रामपंचायतीने जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.सरपंच आनंद मलेवार आणि ग्रामसेविका निरंजना खंडाळकर यांच्या दूरदृष्टीने गावात वेगाने विकासकामे करण्यात आली.ग्रामपंचायत सदस्यांचा सक्रीय सहभाग आणि नागरिकांचा पुढाकारही यासाठी महत्वाचा ठरला. ग्रामपंचायतीने गावविकासाचा निर्धार घेतला. सरपंच आनंद मलेवार यांच्या मार्गदर्शनात तीन वर्षात गावाचा कायापालट करण्यात आला. नेरीची लोकसंख्या २२३५ आहे. गाव लहान असले तरी समस्या अनेक होत्या. मात्र या समस्यांवर मात करून लोकोपयोगी प्रयोग राबविण्यात आले. सदर पुरस्काराच्या निकषानुसार ग्रामपंचायतीने वार्षिक ग्रामसभा, मासिक सभा नियोजित केल्या. लोकसहभागावर भर दिला. ग्रामसभेत कामांचे नियोजन केले. त्याला गती दिली. शासनाने ठरवून दिलेले पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना विहित मुदतीत पूर्ण केले. मग्रारोहयो अंतर्गत शेळीपालन, गुरांचा गोठा, सिंचन विहिरींची कामे करण्यात आली. पाच टक्के दिव्यांग निधी, १० टक्के महिला व बालकल्याण निधी, १५ टक्के इतर मागासवर्गीय निधी खर्च केला. पाणीपुरवठा योजना, स्मशानभूमी, आठवडी बाजार, सुसज्ज व्यायामशाळा अशा योजना पूर्णत्वास नेल्या.जनजागृतीसाठी कलापथक, भित्तीपत्रके, फलक, पेंटींग तयार केले. लोकसहभागांतर्गत २०१८-१९ मध्ये नागरिकांकडून ८४ हजारांची लोकवर्गणी गोळा करण्यात आली. गावाच्या या विकासाची दखल घेत सदर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्कारासाठी निवड झाल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बागडे यांनी दिली. विकासकामात सरपंच आनंद मलेवार, उपसरपंच रामदास जगनाडे, सदस्य कमलेश वैद्य, अजय लांजेवार, विठ्ठल गेडाम, लक्ष्मी पालांदूरकर, रिता मेश्राम, निरंजना हजारे, प्रतीमा भांडारकर, साधना पडोळे, कर्मचारी श्रीराम वैद्य, केशव देशमुख, दीपक ढोमणे, अनिल पडोळे, राजकुमार हजारे यांचे सहकार्य लाभले.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत